Vadgaon Maval : वडगावच्या पाणीपुरवठा व्यवस्थेसाठी निधी उपलब्ध करण्याची बाळा भेगडे यांच्याकडे मागणी

एमपीसी न्यूज- वडगाव नगरपंचायतीच्या प्रशासकीय इमारतीसाठी व शहरातील सुनियोजित पाणी पुरवठा व्यवस्थेसाठी आवश्यक असलेला निधी उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी नगरपंचायतीच्या वतीने काल (दि 18) रोजी राज्यमंत्री ना संजय तथा बाळा भेगडे यांचे कडे करण्यात आली. यासंदर्भात नगराध्यक्ष मयुर ढोरे, नगरसेवक राजेंद्र कुडे, सुनील ढोरे, दिलीप म्हाळसकर आदींनी राज्यमंत्री बाळा भेगडे यांची भेट घेऊन मागणी केली.

नगरपंचायत ही नवनिर्वाचित असल्याने विकासकामे करण्यासाठी लागणारा निधी उपलब्ध होत नाही. प्रामुख्याने नागरिकांच्या कामकाजासाठी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, मुख्याधिकारी तसेच विविध समित्यांचे सभापती यांच्यासाठी स्वतंत्र कक्ष, कर्मचारी व प्रशासकीय कामकाजासाठी दालन, सभागृह अशा सुसज्ज प्रशासकीय इमारतीची आवश्यकता आहे. त्यासाठी 5 कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करुन द्यावा व शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन पाणीपुरवठयाचे योग्य नियोजन होणे गरजेचे आहे. याविषयी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे प्रस्ताव पाठविण्यात आलेला असून पाणी पुरवठा योजनेसाठी 3.50 कोटी रूपये निधीची मागणी करण्यात आली आहे.

त्यामुळे प्रशासकीय इमारतीसाठी 5 कोटी व पाणीपुरवठा योजनेसाठी साडेतीन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे. लवकरच राज्यमंत्री बाळासाहेब भेगडे यांनी निधी उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन दिले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.