Vadgaon Maval : पोटोबा महाराज व दत्त मंदिरासमोरील ओढा बंदिस्त करण्याची मागणी

एमपीसी न्यूज – श्री पोटोबा महाराज मंदिर आणि दत्त मंदिरासमोरील ओढा बंदिस्त करून मिळावा अशी मागणी श्री पोटोबा महाराज देवस्थानचे मुख्य विश्वस्त सोपानराव म्हाळसकर व सचिव अनंता कुडे आणि सर्व विश्वस्तांनी केली आहे.

याबाबत नगराध्यक्ष मयूर ढोरे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, श्री पोटोबा महाराज मंदिरासमोरील ओढा 100 फूट लांब आणि 20 फूट रूंद असून मध्यवस्तीत आहे. हा नाला आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक आहे.

तसेच दत्त मंदिरासमोरील ओढा 70 फूट लांब व 20 फूट रूंद असून हा नाला देखील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक आहे. तरी हे दोन्ही नाले बंदिस्त पाईप लाईन व मो-या टाकून पुलाचे काम करावे. सदरचे काम नगरपंचायतीचे फंडातून करून देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.