Vadgaon Maval : भाजपच्या ‘एक हात मदतीचा’ उपक्रमांतर्गत कुणेनामा येथे गरीब कुटुंबांना अन्नधान्य वाटप

एमपीसी न्यूज : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर मावळ तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ‘एक हात मदतीचा’ या उपक्रमाअंतर्गत कुणे नामा ( मावळ ) येथे सरपंच संदीप उंबरे यांच्या वतीने गरजू व गरीब कुटुंबांना अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तू वाटप करण्यात आले. तसेच भाजप तालुका महिला आघाडी तालुका अध्यक्षा सायली बोत्रे यांच्या वतीने एक हजार मास्कचे वाटप करण्यात आले.

माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, मावळचे तहसीलदार मधुसुदन बर्गे, भाजपचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, तालुकाध्यक्ष रविंद्र भेगडे, महिला आघाडी अध्यक्षा सायली बोत्रे, जितेंद्र बोत्रे आणि भाजप पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.

यावेळी तहसीलदार बर्गे यांनी भाजपच्या वतीने सुरू असलेल्या मदतकार्याचे कौतुक केले. त्यासोबतच यासाठी प्रशासकीय यंत्रणेच्या सर्वतोपरी सहकार्याची ग्वाही सुद्धा दिली.

संदीप उंबरे हे भारतीय जनता पक्ष आदिवासी संघटनेचे अध्यक्ष आहेत. त्यांच्यावतीने गेल्या महिन्याभरात जवळपास एक हजार गरजू कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. कुणेनामा येथे आज दोन हजार गरजू नागरिकांना अन्नधान्य देण्यात आले. यावेळी सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचे तंतोतंत पालन करण्यात आले.

ग्रामीण भागात कोरोना प्रादूर्भाव रोखण्यासाठी झालेली ही जनजागृती आनंद देणारी आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.