HB_TOPHP_A_

Vadgaon Maval : आदिवासी भागातील 1000 विद्यार्थ्यांना रोटरी क्लबतर्फे शालेय वस्तूंचे वाटप

403

एमपीसी न्यूज- आंदरमावळ भागातील शाळांमधील सुमारे 1000 विद्यार्थ्यांना रोटरी क्लब अॉफ पुणे, रोटरी क्लब अॉफ पुणे नॉर्थ , रोटरी क्लब अॉफ पुणे मेट्रो व द वर्ल्ड अॉफ कॅनडा यांचे संयुक्त विद्यमाने 50 लाख रुपये किंमतीच्या (स्लीपींग किट, शालेय किट ) वस्तुंचे वाटप करण्यात आले. पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या शोभाताई कदम यांच्या प्रयत्नातुन, वैभव पोरे यांच्या सहकार्याने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

HB_POST_INPOST_R_A

याप्रसंगी उपस्थित पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष संजोग वाघेरे, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापुसाहेब भेगडे, पुणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, जिल्हा परिषद सदस्या शोभाताई कदम, पुणे रोटरी क्लबचे आध्यक्ष पंकज आपटे, पुणे मेट्रोच्या अध्यक्षा भावना मॅडम, नॉर्थच्या नीना मॅडम, कॅनडाचे ख्रिस हिल्स, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शरदचंद्र माळी, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष दीपक हुलावळे , संत तुकाराम सहकारी सहकारी कारखान्याचे संचालक अंकुश आंबेकर,गटशिक्षण अधिकारी वाव्हळ मॅडम ,संघटन मंत्री नारायण ठाकर, राष्ट्रवादी ग्रामीण युवक अध्यक्ष कैलास गायकवाड, भोयरे गावचे सरपंच बळीराम भोईरकर व विभागातील सर्व गावांचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील, सर्व पदाधिकारी, ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते.

या उपक्रमामुळे विद्यार्थी व पालकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला.

HB_POST_END_FTR-A4
HB_POST_END_FTR-A1

%d bloggers like this: