BNR-HDR-TOP-Mobile

Vadgaon Maval : शिवजयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी शामराव ज्ञानेश्वर ढोरे यांची निवड

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज- वडगाव मावळ शिवजयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी शामराव ज्ञानेश्वर ढोरे तर कार्याध्यक्षपदी महेंद्र बाळासाहेब म्हाळसकर आणि खजिनदारपदी प्रसाद अरविंद पिंगळे यांची निवड करण्यात आली.

वडगाव मावळ येथील श्री दत्त मंदिरामध्ये झालेल्या बैठकीमध्ये शिवजयंती उत्सव समितीचे आजी माजी पदाधिकारी, सल्लागार, संघटक आदींच्या उपस्थितीत संस्थापक भास्कर अप्पा म्हाळसकर यांनी कार्यकारिणी जाहीर केली. वडगाव मावळ मध्ये गेली अनेक वर्षांपासून साजरा होत असलेला शिवजयंती उत्सवाचे हे 40 वे वर्ष आहे.

HB_POST_END_FTR-A2

.