Vadgaon Maval : मावळ तालुकास्तरीय चित्रकला स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

एमपीसी न्यूज- पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त मावळ तालुका युवक काँग्रेसच्या वतीने तालुकास्तरीय भव्य चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली. या स्पर्धेमध्ये मावळ तालुक्यातील विविध 20 शाळांनी सहभाग घेतला.

आदर्श विद्यामंदिर तळेगाव दाभाडे येथे विद्यार्थी गुणगौरव समारंभ पार पडला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पुणे जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष सोमनाथ दौंडकर, कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माऊली दाभाडे तसेच ज्येष्ठ नेते चंद्रकांत सातकर, यादवेंद्र खळदे, मावळ तालुका काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब ढोरे,जिल्हा समन्वयक खंडूजी तिकोने, युवक अध्यक्ष विलास मालपोटे, वडगावचे नगराध्यक्ष मयूर ढोरे,युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष जितेंद्र खळदे,लोणावळा शहर अध्यक्ष विलास बडेकर ज्येष्ठ नेते दत्ता भाऊ गवळी ,काँग्रेस चे खजिनदार विलास विकारी, सरचिटणीस विजय काशीद, माजी अध्यक्ष गणेश काजळे, तळेगाव शहराध्यक्ष विशाल वाळुंज, युवक उपाध्यक्ष सचिन काशीद, मावळ तालुका युवती अध्यक्षा वैष्णवी झगडे, युवक खजिनदार संदीप मालपोटे, पवन मावळ अध्यक्ष राकेश मोहिते, मावळ तालुका युवक संघटक आदिनाथ जगताप, आयेशा खान मॅडम आदी युवक पदाधिकारी उपस्थित होते.

सूत्रसंचालन विशाल वाळुंज यांनी केले. प्रास्ताविक युवक अध्यक्ष विलास मालपोटे यांनी केले आणि आभार युवक कार्याध्यक्ष जितेंद्र खळदे यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.