Vadgaon Maval: शोभा कदम यांच्या प्रयत्नांमुळे जिल्हा परिषद शाळांच्या बांधकाम-दुरुस्तीसाठी 82 लाखांचा निधी

Vadgaon Maval: Due to the efforts of Shobha Kadam, Zilla Parishad received Rs. 82 lakh for construction and repair of schools लॉकडाऊन असल्याने शाळेला सुट्टी आहे. त्यामुळे शाळा दुरुस्तीच्या कामाला त्वरित सुरूवात करण्यात येणार आहे.

एमपीसी न्यूज- निसर्ग चक्रीवादळात नुकसान झालेल्या मावळ तालुक्यातील टाकवे बुद्रुक-वडेश्वर गटातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांच्या बांधकाम व दुरुस्तीसाठी मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद सदस्य शोभा कदम यांच्या पाठपुराव्यामुळे ८२ लाख ६० हजार रुपये निधी उपलब्ध झाला आहे.

निसर्ग चक्रीवादळामुळे काही शाळांचे पत्रे फुटले असून भिंती धोकादायक झाल्याने विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला लागला होता. लॉकडाऊन असल्याने शाळेला सुट्टी आहे. त्यामुळे या निधीतून शाळा दुरुस्तीच्या कामाला त्वरित सुरूवात करण्यात येणार आहे.

टाकवे बुद्रुक-वडेश्वर गटातील खालील गावातील शाळांना बांधकाम व दुरुस्ती साठी मंजूर निधी खालीलप्रमाणे

1) कोंडीवडे नामा 16 लक्ष, 2) कशाळ 5 लक्ष, 3) कशाळ फाटा 50 हजार, 4) घोणशेत 5 लक्ष व यापूर्वी 16 लक्ष, 5) वहानगाव 4 लक्ष, 6) निळशी 4 लक्ष, 7) खांडी 25 हजार, 8) वडेश्वर (शिंदेवाडी) 1 लक्ष 50 हजार, 9) वडेश्वर (सटवाईवाडी) 50 हजार, 10) वडेश्वर (मोरमारेवाडी) 40 हजार.
11) जांभवली 2 लक्ष, 12) शिरदे 2 लक्ष, 13) उकसान 1 लक्ष, 14) उकसान पठार 1 लक्ष, 15) किवळे 2 लक्ष, 16) पिंपरी बु!! 1 लक्ष 50 हजार, 17) माळेगाव खु !! 1 लक्ष, 19) सावळा (कळकराई) 1 लक्ष 20 हजार, 20) सावळा (मेटलवाडी) 50 हजार, 21) पालेनामा 75 हजार, 22) करंजगाव 50 हजार, 23) बेलज १ लक्ष, 24) अनसुटे 1 लक्ष 50 हजार, 24) इंगळून 50 हजार, 24) पारीठेवाडी 50 हजार.

26) कल्हाट (गावठान) 1 लक्ष, 27) कल्हाट (धनवेवस्ती) 1 लक्ष, 28) कल्हाट (करवंदेवस्ती) 1 लक्ष, 29) बुधवडी 1 लक्ष, 30) सांगीसे (कातकरीवस्ती) 50 हजार, 31) वेल्हवळी 50 हजार, 32)कांब्रे आंमा (कांब्रे पठार) 1 लक्ष, 33) आंबळे 50 हजार, 34) मंगरुळ 50 हजार, 35) नाणे (नवीन पुनर्वसन) 3 लक्ष 50 हजार, 36) नवलाख उंबरे (शेटेवस्ती) 50 हजार, 37) मिंडेवाडी 50 हजार, 38) जाधववाडी 50 हजार, 39) बधलवाडी 50 हजार असे एकूण 82 लक्ष 60 हजार रुपये मंजूर करुन घेतले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.