BNR-HDR-TOP-Mobile

Vadgaon Maval : डॉ. आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून पार्थ पवार यांचा वडगाव मावळ भागात प्रचार

PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज- भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून मावळ लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार पार्थ पवार, तसेच आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मावळ तालुक्यातील विविध बुद्धविहार व समाज मंदिरात जाऊन डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली अर्पण केली. तसेच शहरातील बाजारपेठेत पदयात्रा काढून मतदारांशी संपर्क साधला.

पार्थ पवार यांनी रविवारी देहूरोड, तळेगाव दाभाडे, वडगाव, कामशेत व लोणावळा येथे जाऊन बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. वडगाव मावळ येथील मध्यवर्ती संपर्क कार्यालयाचे उद्घाटन पार्थ पवार यांचे हस्ते करण्यात आले. मिलिंदनगर येथील समाज मंदिरामध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर याच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.

त्यानंतर बाजारपेठेतून पदयात्रा काढून मतदारांशी संपर्क साधला. यावेळी तालुका अध्यक्ष बबनराव भेगडे, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब ढोरे, तालुका कार्याध्यक्ष सुभाष जाधव, नगरसेवक किशोर भेगडे, जि प सदस्य बाबुराव वायकर, नगराध्यक्ष मयूर ढोरे, ज्येष्ठ नेते सुनील चव्हाण, अशोक घारे, मंगेश ढोरे, नगरसेवक संतोष भेगडे, राजेंद्र कुडे, चंद्रजीत वाघमारे, माजी उपसरपंच विशाल वहिले, अल्पसंख्यांकचे तालुकाध्यक्ष अफताब सय्यद, ओबीसीचे तालुकाध्यक्ष अतुल राऊत, राहूल ढोरे आदी उपस्थित होते.

तळेगाव शहरातून पार्थ पवार याना जास्तीतजास्त मताधिक्य देण्याचा निर्धार

तळेगाव दाभाडे येथे राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या खळदेआळी येथे रविवारी (दि. 14) बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये पार्थ पवार यांना संपूर्ण तळेगाव शहरातून जास्तीत जास्त मताधिक्य मिळवून विजयी करू असे आश्वासन सर्वांनी मिळून दिले.

यावेळी माजी नगराध्यक्ष सुरेश भाऊ चौधरी, तळेगाव शहर काँग्रेस अध्यक्ष यादवेंद्र खळदे, माजी नगरसेवक दिलीप खळदे, माजी नगरसेवक चंद्रभान खळदे, जेष्ठ मार्गदर्शक आण्णासाहेब दाभाडे, नगरसेवक अरुण माने, नगरसेविका वैशाली दाभाडे, माजी नगराध्यक्षा शालिनीताई खळदे, सतीश खळदे, दिलीप चौधरी, बाळासाहेब शेडगे, विशाल पवार, बापु कदम, अमर खळदे, सुनील पवार आदी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

तळेगाव स्टेशन भागात पार्थ पवार यांच्या प्रचारासाठी पदयात्रा

तळेगाव स्टेशन प्रभाग क्रमांक 3 मध्ये रविवारी (दि 14) संध्याकाळी सहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत पदयात्रा व घोंगडी बैठकीद्वारे प्रचार करण्यात आला.
रेनो काॅलनी, सत्यकमल काॅलनी, विद्याविहार काॅलनी, म्हाडा काॅलनी, मनोहर नगर, स्वामी समर्थ नगर, आनंद नगर, मोहन नगर इत्यादी ठिकाणी तळेगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेसपक्षाचे वतीने पदयात्रा, घोंगडी बैठकीद्वारे प्रचार करण्यात आला.

यावेळी तळेगाव शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष गणेश काकडे, युवक अध्यक्ष आशिष खांडगे, महिला अध्यक्षा सुनीता काळोखे, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे, माजी नगराध्यक्ष कृष्णाजी कारके, नगरसेवक गणेश खांडगे, नगरसेविका वैशाली दाभाडे, माजी नगरसेवक सुदर्शन खांडगे, रामभाऊ गवारे, नंदकुमार कोतुळकर, नगरसेवक सुनील कारंडे, शिक्षण मंडळाचे माजी सभापती जयसिंग भालेराव, राजेंद्र दाभाडे आदी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आघाडी,स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष व जनसेवा विकास समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

HB_POST_END_FTR-A4
HB_POST_END_FTR-A1
.