Vadgaon Maval: उपनगराध्यक्षपदासाठी 11 ऑगस्ट रोजी निवडणूक; उमेदवारीबाबत उत्सुकता

उपनगराध्यक्षा माया चव्हाण यांनी कार्यकाल संपल्याने आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

एमपीसी न्यूज- वडगाव मावळ नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदासाठी येत्या मंगळवारी (दि 11) निवडणूक होणार असल्याची माहिती नगराध्यक्ष मयुर ढोरे यांनी दिली.

उपनगराध्यक्षा माया चव्हाण यांनी कार्यकाल संपल्याने आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे रिक्त झालेल्या या पदासाठी मंगळवारी (दि 11) नगराध्यक्ष तथा पीठासीन अधिकारी मयुर ढोरे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा घेऊन निवडणूक घेण्यात येणार आहे.

नगरपंचायतमध्ये सद्य परिस्थितीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे व अपक्ष अशा महाविकास आघाडीची सत्ता असून या आघाडीकडे नऊ तर भाजपाचे सात व एक अपक्ष असे मिळून आठ सदस्य आहेत.

मतदान करण्याची गरज भासल्यास नगराध्यक्ष मयुर ढोरे यांच्या एका मताची भर पडते. त्यामुळे दोन्ही काँग्रेसचे बलाबल जास्त आहे. यापदासाठी अनेकजण तीव्र इच्छुक आहेत. मात्र कोणाला संधी मिळणार हा औत्सुक्याचा विषय ठरणार आहे.

दि 11 ऑगस्ट रोजी सकाळी 11 ते 12 वाजेपर्यंत अर्ज दाखल करणे, 12 ते 12.15 पर्यंत छाननी, 12.15 ते 12.30 पर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत व दुपारी 12.30 निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.