Vadgaon Maval : वडगाव मावळ न्यायालयात नेत्र तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

एमपीसी न्यूज- वडगाव बार असोसिएशन व स्प्रिंग व्हीजन यांचे संयुक्त विद्यमाने वडगाव मावळ न्यायालयात नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिरात न्यायाधीश, वकील, न्यायालयीन कर्मचारी, पक्षकार अशा सुमारे 300 जणांनी सहभाग घेतला.

या शिबिराच्या उदघाटनप्रसंगी न्या.धुमकेकर, न्या. पुरी, न्या. कुलकर्णी, न्या.कावळे, न्या. जतकर, न्या गायकवाड, वडगाव बार आसो.अध्यक्ष ॲड यशवंत गोरे, उपाध्यक्ष ॲड प्रताप शेलार, सचिव ॲड घनश्याम दाभाडे, खजिनदार ॲड अविनाश पवार, स्प्रिंग व्हीजनचे प्रोजेक्ट डायरेक्टर विजय उत्तरवार, माजी अध्यक्ष ॲड राजेंद्र गाडे, ॲड तुकाराम काटे, नगरसेवक अॅड विजय जाधव, अॅड अजित वहिले, अॅड शैलेश पडवळ तसेच बार असोसिएशनचे सर्व सभासद उपस्थित होते.

शिबिरात न्यायाधीश, वकील, न्यायालयीन कर्मचारी, पक्षकार अशा सुमारे 300 जणांनी सहभाग घेतला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.