Vadgaon Maval : शेतकरी ते ग्राहक थेट विक्री योजनेअंतर्गत ‘शेतकरी आठवडे बाजार सुरु’; वडगाव शहरात दर रविवारी भरणार आठवडे बाजार

एमपीसी न्यूज- शेतकरी ते ग्राहक थेट विक्री योजनेतर्गत नगरसेवक किशोर भेगडे यांच्या संकल्पनेतून वडगाव शहरामध्ये नगरसेविका पूजा वहिले यांच्या पुढाकाराने आणि तुषार वहिले, सौरभ सावले यांच्या प्रयत्नाने सुरू करण्यात आलेल्या शेतकरी आठवडे बाजाराचा शुभारंभ रविवारी (दि 15) करण्यात आला.

वडगाव मावळ येथील ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज मंदिर प्रांगणात सुरू करण्यात आलेल्या या आठवडे बाजाराचे उदघाटन जिल्हा परिषद सदस्य बाबुराव वायकर, श्री पोटोबा महाराज देवस्थानचे मुख्य विश्वस्त सोपानराव म्हाळसकर, वडगाव नगरपंचायतीचे नगराध्यक्ष मयुर ढोरे, उपनगराध्यक्ष राहुल ढोरे, यांचे हस्ते व तळेगाव नगरपरिषदेचे विद्यमान नगरसेवक किशोर भेगडे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले

या आठवडे बाजाराच्या उदघाटनप्रसंगी नगरसेविका शारदा ढोरे, पूनम जाधव, माया चव्हाण, सुनील शिंदे, विशाल वहिले, सोमनाथ धोंगडे, अनंता कुडे, सुनील दंडेल, अर्जुन ढोरे, किरण भिलारे, सुरेश जांभुळकर, भूषण मुथा, अफताब सय्यद, गणेश भेगडे, गणेश पं ढोरे आदी उपस्थित होते.

गटशेती करून शेतकरी ते ग्राहक या संकल्पनेतून हा आठवडे बाजार सुरु करण्यात आला आहे. आहे. नागरिकांना ताजी भाजी थेट त्यांच्या दारात मिळावी आणि शेतकरी बंधूंना देखील दोन रुपये फायदा व्हावा, हा या मागील उद्देश आहे. स्वच्छ व ताजा भाजीपाला थेट शेतकऱ्यांकडून मिळत असल्याने ग्राहक देखील खूश झाले आहेत.

आठवडे बाजार कायमस्वरूपी राहावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. या आठवडे बाजारामध्ये सेंद्रिय व गावरान भाजीपाला-फळे, धान्य, कडधान्य, राजसी भाजीपाला, मसाले, लोणचे, पापड, गावरान तूप, अंडी उपलब्ध असणार आहे. दर रविवारी हा आठवडे बाजार भरणार असून दुपारी 3 ते रात्री 8 अशी या बाजाराची वेळ असणार आहे.

संत शिरोमणी श्री सावतामाळी शेतकरी आठवडे बाजार अभियानांतर्गत दर रविवारी होणा-या या बाजारामध्ये शेतक-यांच्या शेतामध्ये उत्पादित केलेला ताजा भाजीपाला, उत्तम दर्जाचा भाजीपाला उपलब्ध होणार आहे, असे नगरसेविका पूजा वहिले यांनी यावेळी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.