Vadgaon Maval : लोकसभा निवडणुकीत उत्तम कार्य केल्याबद्दल कार्यकर्त्यांचा आमदारांच्या हस्ते सत्कार

एमपीसी न्यूज – वडगांव मावळ येथे मावळ तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने गणप्रमाणे कार्यकर्त्यांचा पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. विशेष सत्कार मावळ लोकसभा निवडणुकीत मावळ विधानसभा मतदारसंघातुन खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांना मोठ्या मताधिक्याने विजय मिळवून दिल्याबद्दल मावळ भाजपच्या वतीने स्थानिक लोकप्रतिनिधी, बूथ प्रमुख,पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा यांचा विशेष सत्कार पुणे जिल्हा भाजपचे अध्यक्ष आमदार संजय उर्फ बाळा भेगडे आणि तालुका अध्यक्ष प्रशांत ढोरे यांच्या हस्ते करण्यात आला. पुन्हा एकदा मोदी सरकारवर विश्वास दाखवल्याबद्दल मतदारांचे देखील आभार मानण्यात आले.

यावेळी माजी आमदार दिगंबर भेगडे, शंकरराव शेलार, बाळासाहेब जांभुळकर,माऊली शिंदे, अविनाश बवरे,लोणावळा नगराध्यक्षा सुरेखा जाधव, श्रीधर पुजारी नितीन मराठे, पांडुरंग ठाकर, गुलाबराव म्हाळसकर, शांताराम कदम, धोंडीबा मराठे, शांताराम काजळे, दत्तात्रय गुंड,मिलिंद बोत्रे, नंदा सातकर,निकिता घोटकुले, ज्योती शिंदे, सुमित्रा जाधव, बाळासाहेब घोटकुले, रविंद्र भेगडे, गणेश धनिवले, कैलास पानसरे, रवींद्र आवारे, संदीप काकडे, गणेश गायकवाड,राजेश मुर्हे,संतोष जांभुळकर, यदुनाथ चोरघे,किरण भिलारे,आदींसह लोणावळा,तळेगाव, देहूरोड व ग्रामीण भागातील असंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  • विशेष आमदार बाळा भेगडे यांनी ग्रामिण भागात ज्या बुथवर जास्त आघाडी राहिली त्यांना विशेष निधी जाहीर केला. उदयडी प्रथम क्रमांक 25 लाख,लोहगड द्वितीय क्रमांक 15 लाख आणि थोरण तृतीय क्रमांक 10 लाख असा विशेष निधी कार्यकर्त्यांनी केलेल्या चांगल्या कामाबद्दल जाहीर केला.

मोदी सरकार मिळालेल्या चांगल्या यशाबद्दल मावळ भाजपचे वतीने,अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाबूलाल गराडे व अर्जुन पाठारे यांनी तर, आभार अनंता कुडे यांनी मानले

◆प्रथम क्रमांक–सोमाटने गण
◆द्वितीय क्रमांक–कुसगाव गण
◆तृतीय क्रमांक–वाकसई गण

  • बुथप्रमाणे क्रमांक :
    ◆प्रथम क्रमांक–उदेवाडी
    ◆द्वितीय क्रमांक–लोहगड
    ◆तृतीय क्रमांक–थोराण

शहर :
◆तळेगांव दाभाडे
◆लोणावळा
◆वडगांव

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.