Vadgaon Maval : नगरपरिषदेचा 50 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प तयार

एमपीसी न्यूज- वडगाव नगर पंचायतीची स्थापना होऊन आज 20 जुलै रोजी एक वर्ष पूर्ण झाले. वडगाव नगरपंचायतीच्या माध्यमातून मागील वर्षभरात विविध विकासकामांसाठी निधी प्राप्त झाला असून आगामी 2019-20 या वर्षासाठी 50 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प तयार करण्यात आला आहे अशी माहिती नगराध्यक्ष मयूर ढोरे यांनी दिली.

यावेळी मयूर ढोरे यांनी आगामी वर्षभराच्या कामकाजाचा आढावा घेतला. मुंबईच्या आयआयटी संस्थेकडून वडगाव शहराची सुनियोजित शहर योजने अंतर्गत निवड झाली असून पाणी व्यवस्थापन, भुयारी गटारे, रेन वॉटर हार्वेस्टिंग, कचरा व्यवस्थापन या चार विषयाचा प्रस्ताव मजूर करून घेतला असल्याचे मयूर ढोरे यांनी सांगितले. स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत 2 लाख रुपये खर्चाच्या नागरी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाला मंजुरी मिळाली असून विविध प्रभागातील एक कोटी 54 लाख रुपयांच्या कमला मंजुरी देण्यात आली आहे. लवकरच या कामाला सुरुवात होणार आहे.

मंजूर झालेल्या आकृतिबंधाप्रमाणे व सरकारी धोरणाप्रमाणे कर्मचाऱ्यांची पदे भरली जातील त्याचप्रमाणे ग्रामपंचायत काळातील कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेतले जाईल. अशी माहिती मयूर ढोरे यांनी दिली. आगामी काळात शहरात विकासकामे वेगाने मार्गी लावण्यात येतील आणि सुनियोजित शहर म्हणू वडगावच्या नावलौकिक होईल असा विश्वास मयूर ढोरे यांनी व्यक्त केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.