Vadgaon Maval : वडगावमध्ये शेतालगतच्या परिसराला आग; वेळीच नियंत्रण मिळविल्याने मोठा अनर्थ टळला

एमपीसी न्यूज – वडगाव मावळ येथील सुभाष जाधव यांच्या शेतालगतच्या परिसराला दुपारी 1 वाजता अचानक आग लागली. स्थानिक तरूण, पोलीस व अग्निशमन विभागाच्या जवानांनी तात्काळ आगीवर नियंत्रण मिळविले. आगीचे कारण समजू शकले नाही.

आग लागलेल्या ठिकाणी फिनिक्स पॅकेजिंग व पेहिप वायर हारलिस अशा दोन कंपन्यांचा परिसर आहे. वेळीच खबरदारी घेतल्याने मोठा अनर्थ टळल्याची चर्चा वडगाव मावळमध्ये सुरू आहे.

वडगाव मावळ येथे लागलेल्या आगीची माहिती तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे नगरसेवक संतोष भेगडे व उपनगराध्यक्षा वैशाली दाभाडे यांनी अग्निशमन विभागाला तातडीने कळवून बंब घटनास्थळी रवाना करण्यात आला. त्यामुळे आग पसरली नाही.

अग्निशमन विभागाच्या जवानांच्या मदतीने व वडगाव मावळ येथील कार्यकर्ते विशाल वहिले, मंगेश खैरे, सचिन ढोरे, शाम ढोरे, अफताब सय्यद, नगराध्यक्ष मयुर ढोरे, महेंद्र म्हाळसकर आदी असंख्य कार्यकर्त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन आग विझवण्यात यश मिळवले व आग आटोक्यात आणली. शेजारीच कंपनी परिसर होता. वेळीच खबरदारी घेतल्याने मोठा अनर्थ टळला. कोणत्याही प्रकारचे नुकसान झाले नाही.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.