Vadgaon Maval : गडभटकंती दुर्गसंवर्धन संस्थेच्या वतीने डोंगरवाडी-वडगाव मावळमध्ये उद्या मोफत पशू वैद्यकीय तपासणी शिबिर

एमपीसी न्यूज – गडभटकंती दुर्गसंवर्धन संस्था वडगाव मावळच्या वतीने मोफत पशु वैद्यकीय तपासणी शिबिराचे आयोजन केले आहे. हे पशू वैद्यकिय तपासणी शिबिर शनिवारी (दि.23) सकाळी 8 वाजता आयोजित केले आहे, अशी माहिती गडभटकंती दुर्गसंवर्धन संस्थेचे पदाधिकारी डॉ.श्री.राजेंद्र जाधवर यांनी दिली.

_MPC_DIR_MPU_II

किल्ले तिकोणा गडावर दुर्ग संवर्धनाचे काम करता करता संस्था सामाजिक कार्यालाही महत्व देते. संस्थेने या वेळेस एक आगळा वेगळा उपक्रम हाती घेतला आहे. वडगाव मावळ शेजारील डोंगरावर डोंगरवाडी नावाचे गांव आहे. या गावी जायचे झाल्यास पायी प्रवासाशिवाय पर्याय नाही. कोणताही पशू आजारी पडल्यास त्याच्या उपचारा कामी डोंगर पायी चढून जाण्यास डॉक्टर टाळाटाळ करतात. त्यामुळे पशुंना वेळेवर उपचार मिळत नाहीत त्यातुन पशू अशक्त व रोगी राहत असल्याचे डोंगरवाडीतील ग्रामस्थांनी डोंगरावर व्यायामाकरीता जाणाऱ्या संस्थेच्या पदाधिकारी यांना वेळोवेळी सांगतले होते.

दुर्गम डोंगरवाडीतील पशुंची वैद्यकिय तपासणी करण्याची गरज लक्षात घेता गडभटकंती दुर्गसंवर्धन संस्थेने या करीता पुढाकार घेत पशू वैद्यांस (डॉक्टरांस) डोंगरवाडी या गावी प्रत्यक्ष उपलब्ध करून देऊन या ठिकाणी पशूधनाची मोफत वैद्यकिय तपासणी करण्याचे ठरविले आहे, , असे संस्थेच्या वतीने सांगितले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.