Vadgaon Maval : अन्नछत्रालयातून गोरगरिबांना मिळतेय दोन वेळचे जेवण

एमपीसी न्यूज : आमदार सुनील शेळके यांच्या ‘मदत नव्हे कर्तव्य’ ह्या उपक्रमाअंतर्गत वडगाव नगरपंचायत व लोकसहभागातून गरजू कुटुंबासाठी ‘अन्नछत्रालय’ सुरु करण्यात आले आहे. या अन्नछत्रालयातून गरजूंना दोन वेळचे जेवण देण्यात येत आहे.

अन्नदानाचा हा उपक्रम अतिशय नियोजन पद्धतीने सुरू आहे. अन्नदान करताना आमदार सुनील शेळके, तहसीलदार मधुसूदन बर्गे, तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दिपक झिंजाड आणि अधिकारी उपस्थित होते.

यावेळी आमदार शेळके यांच्या वतीने अन्नछत्राला बिस्कीटचे 100 बाॅक्स देण्यात आले. नगराध्यक्ष मयूर ढोरे, उपनगराध्यक्षा मायाताई चव्हाण, मुख्याधिकारी सुवर्णा ओगले,पोटोबा देवस्थानचे विश्वस्त सुभाष जाधव, तुकाराम ढोरे, नगरसेवक राजेंद्र कुडे, राहुल ढोरे, चंद्रजीत वाघमारे, किरण म्हाळसकर, नगरसेविका शारदा ढोरे, पूनम जाधव, पूजा वहिले, प्रमिला बाफना, इतर मान्यवर तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.

वडगाव नगरपंचायतीने लोकसहभागातून सुरु केलेल्या अन्न छत्रालयास संस्कृती मित्र मंडळ यांच्या वतीने 50 किलो तांदूळ तसेच विशाल चव्हाण, हेमंत जाधव, महेश ढोरे, जगदीश ढोरे यांनी 120 किलो कांदे देऊन सहकार्य केले.

आपणा सर्वांच्या सोबतीने, सहकार्याने या अन्नछत्रालयास शहरातील सर्व सामान्य नागरिक, काही व्यापारी सढळ हाताने प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे मदत करताहेत त्यांचे आमदार शेळके यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.