Vadgaon Maval : आदर्श शिक्षिका गीता कमलाकर कदम यांचे निधन

एमपीसी न्यूज- वडगाव मावळ येथील सेवानिवृत्त आदर्श शिक्षिका गीता कमलाकर कदम (वय 80) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.

पुणे जिल्हा परिषदेच्या वडगाव मावळ येथील प्राथमिक शाळेत सलग 32 वर्षे अध्यापन कार्य केले. त्या विद्यार्थीप्रिय शिक्षिका होत्या. सामाजिक कार्यात अग्रेसर होत्या. त्यांना आदर्श शिक्षिका पुरस्कारासह अनेक सामाजिक क्षेत्रातील पुरस्कार प्राप्त होते. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

सार्वजनिक बांधकाम विभाग पुणे भांडारपाल सुहास कदम व लायन्स क्लब ऑफ वडगाव मावळ अध्यक्ष सुनीत कदम यांच्या त्या मातोश्री होत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.