Vadgaon Maval : सहकारामुळे महाराष्ट्रातील ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट- बाळासाहेब नेवाळे

एमपीसी न्यूज- सहकारामुळे महाराष्ट्रातील ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट केली आहे. सहकारी संस्थांनी पतपुरवठा केल्याने अनेक कुटुंबे उभी राहिली आहेत. कर्जदार सभासदांनी नियमित कर्ज फेडणे गरजेचे आहे असे आवाहन पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक बाळासाहेब नेवाळे यांनी केले.

नवजीवन नागरी सहकारी पतसंस्था व जिजामाता महिला नागरी सहकारी पतसंस्था यांच्या वतीने साते येथील नवजीवन नागरी सहकारी पतसंस्था व जिजामाता महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या पाचव्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे औचित्य साधून मावळ तालुक्यातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा ” संकल्प सामाजिक जीवनगौरव पुरस्कार ” देऊन सत्कार करण्यात आला. यामध्ये गोल्डन ग्लेड्स एज्युकेशन सोसायटी करंजगावचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव टाकवे ( शिक्षण), सुकनशेठ बाफना ( गो-सेवा ), रवींद्र भेगडे (अध्यक्ष – मावळ प्रबोधिनी), संतोष दाभाडे ( निर्मलवारी), सुनील ढोरे (बांधकाम व्यावसायिक), दिलीप महाराज खेंगरे ( धार्मिक), मारुती दळवी (कृषी), रामदास वाडेकर ( पत्रकारिता) यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक बाळासाहेब नेवाळे,माजी उपसभापती पै.चंद्रकांत सातकर, वडगावचे नगराध्यक्ष मयुर ढोरे यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यावेळी पुरस्कार्थींनी मनोगत व्यक्त केले. ग्रामीण भागातील आर्थिक व्यवस्था बळकट करण्याचे काम पतसंस्थेच्या माध्यमातून होत असते, असे मत पै.चंद्रकांत सातकर यांनी व्यक्त केले.

यावेळी पतसंस्थेचे संस्थापक मारुती आगळमे, अध्यक्ष सोपान काटकर, माजी सरपंच प्रकाश आगळमे, सरपंच विठ्ठल मोहिते, पोपट आगळमे, दत्तात्रय निम्हण दशरथ आगळमे, किसनआगळमे, विनायक आगळमे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मारुती आगळमे यांनी तर सूत्रसंचालन विठ्ठल मोहिते यांनी केले. आभार शशिकांत गायकवाड यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.