Vadgaon Maval: वडगाव भाजपाच्या वतीने न्यू इंग्लिश स्कूल प्राथमिक शाळेला पाच संगणक संच भेट

एमपीसी न्यूज – वडगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या प्राथमिक विद्या मंदिर या शाळेला (Vadgaon Maval)वडगाव शहर भाजपाच्या वतीने नगरसेवक  रविंद्र बाळासाहेब म्हाळसकर यांच्या संकल्पनेतून पाच सगंणक संच देण्यात आले. संगणक संच वाटप कार्यक्रम माजी राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे यांच्या हस्ते, मावळ भाजपाचे प्रभारी भास्करराव म्हाळसकर यांच्या अध्यक्षतेखाली, शहर अध्यक्ष अनंता कुडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मंगळवारी (दि. 28) संपन्न झाला.

माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी शाळेसाठी डीपीसीच्या माध्यमातून क्रिडांगण, ग्रंथालय यासाठी निधी उपलब्ध करून देऊ असे आश्वासन दिले. कार्यक्रमाचे अध्यक्ष भास्करराव म्हाळसकर यांनी मनोगतामध्ये नगरसेवक रविंद्र म्हाळसकर यांनी दिलेले संगणक शाळेतील विद्यार्थ्यांचे  भविष्य उज्वल करेल असे मत व्यक्त केले.

यावेळी उपस्थितांमध्ये माजी सभापती गुलाबराव (Vadgaon Maval) म्हाळसकर,सिनेक्रॉन कंपनीचे एचआर राजेश आगळे, वडगाव नगरपंचायतीचे भाजपाचे गटनेते दिनेश ढोरे,नगरसेवक प्रविण चव्हाण, किरण म्हाळसकर,दिलीप म्हाळसकर,नगरसेविका अर्चना म्हाळसकर, शाळेच्या मुख्याध्यपिका सौ लेंढे,शालेय शिक्षण समितीचे समन्वयक मनोज ढोरे,कार्याध्यक्ष प्रसाद पिंगळे, संघटन मंत्री किरण भिलारे, युवक अध्यक्ष विनायक भेगडे,माजी नगरसेवक ॲड विजय जाधव,भुषण मुथा,श्रीधर चव्हाण, वडगाव सोसायटीचे व्हाईस चेअरमन पंढरीनाथ भिलारे,माजी सरपंच नितीन कुडे,संभाजी म्हाळसकर,सुधाकर ढोरे,ॲड अजित वहिले,गणेश भालेकर,सहकार आघाडी अध्यक्ष सोमनाथ काळे,शरद मोरे,खंडूशेठ भिलारे,शांताराम म्हाळसकर, संतोष म्हाळसकर प्रमोद म्हाळसकर, महेंद्र म्हाळसकर, कुलदीप ढोरे,नितीन गाडे, हारिष दानवे,आकाश म्हाळसकर आदीसह न्यु इंग्लिश स्कुलचे सर्व शिक्षक वर्ग उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक नगरसेवक रविंद्र म्हाळसकर यांनी केले. सूत्रसंचालन राजेंद्र म्हाळसकर यांनी तर आभार मनोज ढोरे यांनी मानले.

Pune : वाढत्या उष्णतेने पुण्यात पाणी साठ्यात घट

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.