Vadgaon Maval : नगरपंचायतीच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन

एमपीसी न्यूज – वडगाव नगरपंचायतीच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त मान्यवरांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी वडगाव शहरातील सर्व अंगणवाडी शिक्षिका वृंद, मोरया महिला प्रतिष्ठान, मनस्विनी महिला मंच, जैन महिला मंडळ, जागृती महिला मंडळ, कुलस्वामिनी महिला मंडळ या विशेष महिला प्राथमिक संस्थाचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.

यावेळी नगराध्यक्ष मयुरजी ढोरे, उपनगराध्यक्ष राहुल ढोरे, गटनेते राजेंद्र कुडे, महिला बालकल्याण समिती सभापती, नगरसेविका शारदा ढोरे, प्रमिला बाफना, पूनम जाधव,पुजा वहिले, खडकाळा बीट अंगणवाडी प्रशिक्षिका मिना खैरनार, अबोली ढोरे, महिला शहराध्यक्ष ज्योती जाधव तसेच सर्व अंगणवाडी शिक्षिका सेविका, महिला मंडळाच्या सदस्या आणि वडगाव शहरातील महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

HB_POST_END_FTR-A2
You might also like