Vadgaon Maval : लायन्स क्लब ऑफ वडगांव तर्फे केरळ पूरग्रस्तांसाठी मदत रवाना

एमपीसी न्यूज- महापुराच्या तडाख्यात अडकलेल्या केरळ येथील बांधवांसाठी लायन्स क्लब ऑफ वडगांवच्या माध्यमातून आणि वडगांवकर नागरिकांच्या सहकार्यातून केरळ येथे एक पिकअप गाडी भरून साहित्य रवाना करण्यात आले.

लायन्स प्रांताच्या वतीने सर्वत्र ही मोहीम सुरू असून वडगांव येथून रवाना झालेल्या गाडीतून पाठविलेले तसेच प्रांतातील इतर क्लब्ज मार्फत जमा झालेले साहित्य पिंपरी चिंचवड येथे एकत्र जमा करून तेथूनच मदतीच्या साहित्याचे ट्रक्स रवाना होतील. सुस्थितीत असलेली वस्त्रे ,भांडी, धान्य इ स्वरूपातील ही मदत आहे.

लायन्स क्लब ऑफ वडगांव चे संस्थापक अध्यक्ष ला.अॅड. दामोदर भंडारी, अध्यक्ष सुनीत कदम, सचिव जितेंद्र रावल, खजिनदार अमोल मुथा, प्रकल्प प्रमुख अंकित बाफना, अध्यक्ष प्रदीप बाफना, झुंबरलाल कर्णावट, भूषण मुथा, आदिनाथ ढमाले, दिलीप मुथा, संजय गांधी व नागरिक उपस्थित होते

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like