Vadgaon Maval : पोलीस बांधवांना होमिओपॅथिक प्रतिबंधात्मक औषधांचे वाटप

एमपीसी न्यूज – चंद्रभागा होमिओपॅथीक क्लिनिक, वडगाव मावळ व काटे असोसिएट, अ‍ॅडव्होकेट्स यांचे संयुक्त विद्यमाने डॉ. अक्षय तुकाराम काटे यांच्या वतीने वडगाव मावळ, तळेगाव दाभाडे व सोमाटणे येथे बंदोबस्तास असलेल्या सर्व पोलीस बांधवांना होमिओपॅथिक प्रतिबंधात्मक औषधांचे वाटप करण्यात आले.

सद्यस्थितीत सुरू असलेल्या संसर्गजन्य कोरोना साथीच्या (COVID -19) पार्श्वभूमीवर पोलीस बांधव आपले कर्तव्य निस्वार्थीपणे पार पाडत आहेत. त्यांच्या कर्तव्याप्रती निष्ठा ठेवून त्यांच्या कार्यात खारीचा वाटा म्हणून व आपले पोलिस बांधव निरोगी राहून त्यांची सेवा अखंड सुरू रहावी. तसेच त्यांचे कुटुंब देखील निरोगी रहावे, याकरिता होमिओपॅथिक प्रतिबंधात्मक औषधाचे वाटप करण्यात आले. यावेळी अ‍ॅड. धनंजय काटे, अ‍ॅड. चेतन कदम व उद्योजक अभिजित चव्हाण आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.