Vadgaon Maval : वडगावमधील तिघांचा निक्षय मित्र म्हणून राज्यपालांच्या हस्ते गौरव

एमपीसी न्यूज – प्रधानमंत्री टी. बी. मुक्त भारत अभियान (Vadgaon Maval) अंतर्गत सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन आयोजित निक्षय मित्र सन्मान आणि पोषक आहार वितरण सोहळा राजभवन मुंबई येथील दरबार सभागृहात संपन्न झाला. यात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते वडगाव मावळ येथील नगरसेवक प्रवीण चव्हाण, माजी नगरसेवक, वडगांव शहर भाजपा कार्याध्यक्ष प्रसाद पिंगळे, माजी नगरसेवक, लायन्स क्लबचे पदाधिकारी भूषण मुथा यांना निक्षय मित्र म्हणून गौरविण्यात आले.

 या सोहळ्याचे मुख्य अतिथी महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या शुभहस्ते वडगांव मावळ येथील नगरसेवक प्रवीण चव्हाण, माजी नगरसेवक आणि वडगांव शहर भाजपा कार्याध्यक्ष प्रसाद पिंगळे, माजी नगरसेवक आणि लायन्स क्लबचे पदाधिकारी भूषण मुथा यांना निक्षय मित्र म्हणून गौरविण्यात आले. सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासनाचे मुख्य सचिव प्रदीप व्यास, महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभागाचे आयुक्त डॉ.रामा स्वामी, महाराष्ट्र राज्य क्षयरोग विभाग सहसंचालक रामजी अडकेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला.

पुणे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार यांच्या (Vadgaon Maval) मार्गदर्शनाखाली,जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.सुनील पोटे, जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ.संजय दराडे, मावळ तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.चंद्रकांत लोहारे,वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक पी.आर.वंजारी,मावळ तालुका क्षयरोग विभागाचे अधिकारी यांचे सहकार्य यावेळी लाभले.

Sankalp Yojana : उद्योगांना संकल्प योजनेतून कुशल मनुष्यबळ उपलब्ध होईल : अरिंदम लाहिरी

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.