BNR-HDR-TOP-Mobile

Vadgaon Maval : हॉटेल ‘शिवराज’मध्ये मिळते मांसाहारी खवय्यांसाठी रावण थाळी, बकासूर कडकनाथ थाळी

एमपीसी न्यूज – दिवाळीचं सेलिब्रेशन तर दणक्यात झालं. आता तसं बघायला गेलं तर सण समारंभ संपलेले असतात. त्यातच मागील जवळजवळ चार महिने या ना त्या कारणाने शाकाहारीच खावे लागलेले असते. कधी श्रावण, तर गणपती, तर कधी नवरात्र…आता दिवाळीदेखील पार पडली. दिवाळीतील लाडू, मिठाई, शंकरपाळी, अनारसे खाऊन तोंड गोड झाले असणारच. मग गोडाच्या खाण्यावर बदल तर हवाच. अशा वेळी हमखास भेट देण्याचे ठिकाण म्हणजे वडगाव मावळ येथील हॉटेल शिवराज. मांसाहारी प्रेमींसाठी एकच नाव असे ज्याचे सार्थ वर्णन करता येईल असे हॉटेल शिवराज आपल्या वैशिष्ट्यपूर्ण मांसाहारी थाळ्यांमुळे सध्या सर्वत्र प्रसिद्ध आहे.

स्पेशल रावण थाळी, बकासूर कडकनाथ थाळी, सरकार मटण थाळी, पैलवान मटण थाळी, मालवणी फिश थाळी या स्पेशल थाळ्यांनी येथे येणा-याचे स्वागत केले जाते. या हॉटेलची स्पेशालिटी असणाऱ्या पैलवान थाळीमध्ये दोन जण, सरकार थाळीमध्ये पाच ते सहा जण, बकासूर कडकनाथ थाळीमध्ये पाच ते सहा व मालवणी फिश थाळीत दोन ते तीन लोकांचे पोट भरून जेवण होत असल्याने युवकांची या शिवराज स्पेशल मोठ-मोठ्या थाळ्यांना खूप पसंती मिळत आहे. वेगवेगळ्या सणांमध्ये व सुट्टीच्या काळात हॉटेलमध्ये आकर्षक डिस्काउंट असतो. मुख्य म्हणजे वेगवेगळ्या नावांच्या या थाळ्या समोर आल्यावर पहिल्यांदा त्या बघूनच आपण तृप्त होतो. त्यात त्यांची चव घ्यायला सुरुवात केली की दोन घास जेवण जास्तच जाते असे म्हटले तर वावगे होणार नाही. मनसोक्त आणि चविष्ट मांसाहारी पदार्थ आणि ते देखील वाजवी किंमतीत म्हणजे हॉटेल शिवराज ही नवी ओळख सध्या बनली आहे.

येथे याशिवाय स्पेशल कडकनाथ चिकन, स्पेशल गावरान चिकन, स्पेशल मटन भाकरी, पापलेट, सुरमई, मांदेली, प्रॉन्स, चायनीज, कबाब, तंदुरी डिशेस देखील उपलब्ध आहेत. तसेच खास गावरान चव चाखायची असेल तर चुलीवरची ज्वारी व बाजरीची भाकरी आणि मावळची खासियत असलेला इंद्रायणी तांदुळाचा चविष्ट आणि सुगंधी भात देखील मिळेल.

या हॉटेलमध्ये फॅमिलीसाठी विशेष बैठक व्यवस्था आहे. त्यामुळे इतर हॉटेलपेक्षा सहकुटुंब जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी लोक शिवराज हॉटेलला विशेष पसंती देतांना दिसत आहेत. या यशाबद्दल हॉटेल व्यावसायिक अतुल वायकर यांना विचारले असता ते एकच सांगतात की, एकदा या आणि आमचे पदार्थ चाखून बघा. मी अवघ्या पन्नास हजार रुपयांच्या भांडवलात वडगावमध्ये प्रथम शिवराज हॅटिल नावाने व्यवसायास सुरवात केली. हे हॉटेल छोटेसे होते; पण येथील गावरान चिकन हंडीने खवय्यांची मने जिंकली. ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळण्यास सुरुवात झाली.

ग्राहकांच्या गर्दीमुळे या छोट्या हॉटेलमध्ये जागा कमी पडू लागल्याने त्यांनी पुणे-मुंबईमहामार्गालगत नायगाव येथे २०१३ साली पूर्वीपेक्षा मोठे हॉटेल सुरु केले. व्यवसाय उत्तम सुरु होता यामुळे पैसे हाती येऊ लागले. अतुल वायकर यांनी आपल्याकडे गरजेपेक्षा जास्त पैसा असल्यावर गरज आहे त्यांना आपण मदत करणे ही सामाजिक बांधिलकी जपत समाजकार्यास सुरुवात केली.

मावळातील आदिवासी भागातील लोकांना कपडे वाटप करणे, कुपोषित बालकांसाठी पोषक आहाराची व्यवस्था करणे, गरीबांची दिवाळी गोड व्हावी, म्हणून दिवाळीत फराळाचे वाटप करणे, दुर्गम भागातील आदिवासी व दुर्लक्षित वस्तीवर जाऊन त्यांना वैद्यकीय सेवा पुरविणे, वन्य प्राण्यांसाठी पाण्याची व्यवस्था करणे, वृक्ष लागवड, गड किल्ल्यांवर स्वच्छता अभियान राबविणे, अपघातग्रस्तांना मदत करणे, अनाथांना आश्रय देणे; तसेच सामाजिक समस्या व अन्यायाविरुद्ध शासकीय अधिकाऱ्यांना निवेदने देऊन जाब विचारणे आदी सामाजिक कार्यात त्यांनी स्वत:ला झोकून दिले. त्यामुळे अतुल वायकर म्हणजे ‘आपला माणूस’ अशी त्यांची ओळख परिसरात निर्माण झाली आहे.

या प्रवासात त्यांना अनेक अडचणी आल्या. अनेकदा अपयश आले. अशा परिस्थितीत अतुल वायकर यांचे मेहुणे विलासराव काळोखे व ज्येष्ठ बंधू श्रीकांत वायकर यांनी त्यांना मोलाची साथ देत अपयशाच्या गर्तेत अडकलेल्या व अनेक अडचणींचा सामना करणाऱ्या अतुल यांना आर्थिक, मानसिक व सर्व प्रकारची मदत करत यातून बाहेर पडण्यास पाठिंबा दिला व एक यशस्वी हॉटेल व्यावसायिक होण्यास मदत केली. यामुळे अतुल वायकर हेआपले मेहुणे व ज्येष्ठ बंधूंना गुरु मानून यशाची शिखरे सर करीत आहेत. याच काळात बंडोपंत राजाराम निकम यांच्या मोलाच्या सहकार्याने वडगाव येथे नवीन हॉटेल सुरु करणे शक्य झाले.

काही महिन्यांपूर्वीच अतुल वायकर यांनी वडगाव येथील पुणे- मुंबई महामार्गालगत हॉटेल शिवराजची स्थापना केली. वडगाव मावळ येथील हॉटेल शिवराजमधील सर्व सुविधांमुळे व चविष्ट खाद्यपदार्थांच्या गुणवत्ता व अचूकतेसाठी आयएसओकडून प्रमाणित करण्यात आलेले आहे. त्यामुळे मावळ तालुक्यातील प्रसिद्ध असलेले शिवराज हॉटेल त्यांच्या गुणवत्तेसाठी खूप लोकप्रिय झाले आहे. त्यांचे यश पाहून अनेक युवक हॉटेल व्यवसायात येण्यापूर्वी त्यांचे मार्गदर्शन घेत आहेत; तर महाविद्यालयीन तरुण प्रकल्पासाठी शिवराज हॉटेलला भेटी देत आहेत.

हॉटेल शिवराज,
जुना पुणे – मुंबई हायवे, भेगडे लॉन्सजवळ,
वडगाव मावळ, तालुका – मावळ, जि. पुणे.
दूरध्वनी क्रमांक – 9561929999, 9764587799

HB_POST_END_FTR-A2

Advertisement

Advertisement

You might also like