Vadgaon Maval : शहर सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कार्यान्वित करा 

वडगाव भाजपा महिला मोर्चाची मागणी

एमपीसी न्यूज – शहराची वाढती लोकसंख्या, शासकीय कार्यालये, त्यात होणारी गर्दी, बाजारपेठ परिसरातील गजबज आदी बाबी लक्षात घेत शहरात सीसीटिव्ही कॅमेरे कार्यान्वित (Vadgaon Maval) करणे आवश्यक आहे. त्यामुळे नगरपंचायत आणि पोलिसांनी याबाबत तात्काळ कार्यवाही करावी, अशी मागणी वडगाव भाजपा महिला मोर्चाकडून करण्यात आली आहे.

 

यावेळी माजी उपनगराध्यक्षा, नगरसेविका अर्चना म्हाळसकर, वैशाली ढोरे,अश्विनी बवरे,सुमन खेंगले, सुनिता जाधव, संगीता खेंगले, भक्ती जाधव, अक्षदा खेंगले आदी महिला मोर्चा सदस्या उपस्थित होत्या.

 

Talegaon Dabhade : कॅन्सर विरोधात जनजागृतीसाठी रोटरी सिटी पिंकेथॉन

 

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, वडगाव शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन, तसेच अनेक शासकीय कार्यालये असल्यामुळे वडगांव शहरात नागरिकांची वर्दळ वाढत आहे.(Vadgaon Maval) या गर्दीचा गैरफायदा घेऊन चोऱ्या, वाटमारी, छेडछाड असे अनेक प्रकार नेहमी होत आहेत. तसेच अनेक ठिकाणेही नशापान करण्याची केंद्रे बनत आहेत व याचा समस्त वडगावकर नागरिकांस मनस्ताप सहन करावा लागत आहे. महिलावर्ग भीतीच्या छायेखाली वावरत आहे.

 

या सर्व गोष्टींना आळा बसावा यासाठी वडगाव शहर भाजपा महिला मोर्चाने शहरात सर्व वर्दळीच्या तसेच प्रमुख ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत अथवा असलेले कार्यान्वित करावेत अशी आग्रही मागणी नगरपंचायत व वडगाव पोलीस चौकी येथे भाजपा महिला आघाडी अध्यक्षा धनश्री भोंडवे यांनी महिला मोर्चाचे वतीने निवेदन देऊन केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.