Vadgaon Maval: वडगावमध्ये दूषित पाणीपुरवठा; भाजपच्या वतीने 4000 मेडिक्लोर एम बाटल्यांचे वाटप

Vadgaon Maval: In Vadgaon, BJP distributes 4000 Mediclor M bottles मुख्याधिकारी सुवर्णा ओगले यांनी दूषित पाणी पुरवठा होत असल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करत लवकरात लवकर शुध्द पाणीपुरवठा होईल, अशी ग्वाही दिली.

एमपीसी न्यूज- वडगाव मावळ येथील शहरामध्ये दूषित आणि गढूळ पाणी येत आहे. त्यावर उपाययोजना म्हणून भाजप व्यापारी आणि महिला आघाडी यांच्या वतीने 4000 मेडिक्लोर एम बाटल्यांचे वाटप करण्यात आले. याचा प्रारंभ मावळ तालुका भाजपचे प्रभारी भास्कर म्हाळसकर यांच्या हस्ते तर तालुका भाजपचे अध्यक्ष रवींद्र भेगडे, महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष सायली बोत्रे यांच्या उपस्थितीत करण्यात आला.

वडगाव शहरामध्ये सातत्याने दूषित आणि गढूळ पाणी पुरवठा होत असल्याने भाजपच्या वतीने वडगावातील सर्व नागरिकांचे आरोग्य निरोगी रहावे म्हणून हा उपक्रम राबविण्यात आल्याची माहिती भास्कर म्हाळसकर यांनी आपल्या मनोगतात दिली.

तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे यांनी पक्षाचे कार्यकर्ते लहानात लहान समाज कार्य देखील हिरीरीने करतात जेणेकरून समाजातील गरजू घटकांना अशा उपक्रमाचा फायदा होतो, असे मत व्यक्त केले. महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष सायली बोत्रे यांनी आपल्या मनोगतात या उपक्रमाचे कौतुक केले.

मुख्याधिकारी सुवर्णा ओगले यांनी समाधान व्यक्त केले. तसेच दूषित पाणी पुरवठा होत असल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करत लवकरात लवकर शुध्द पाणीपुरवठा होईल तसेच भविष्यात नगरपंचायत यांच्या वतीने सहकार्य राहिल असे सांगितले

व्यापारी आघाडी अध्यक्ष भूषण मुथा आणि महिला आघाडी अध्यक्ष धनश्री भोंडवे यांच्या सहकार्यातून हा उपक्रम राबविण्यात आला असून वडगाव शहर भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या सहयोगातून वडगांव शहरातील सर्व 17 प्रभागांमध्ये प्रभागनिहाय प्रत्येक घरी जाऊन वाटपाचे नियोजन करण्यात आले आहे.

स्वागत शहराध्यक्ष किरण भिलारे यांनी केले. शहर महिला आघाडी अध्यक्ष धनश्री भोंडवे यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन वडगांव शहर व्यापारी आघाडी अध्यक्ष भूषण मुथा यांनी तर आभार प्रदर्शन वडगांव शहर युवा मोर्चा अध्यक्ष रमेश ढोरे यांनी केले.

यावेळी पंचायत समिती सदस्य गुलाब म्हाळसकर, प्रदेश सचिव जितेंद्र बोत्रे, वडगांव नगरपंचायतच्या मुख्याधिकारी सुवर्णा ओगले, वडगाव शहर भाजप अध्यक्ष किरण भिलारे, कार्याध्यक्ष प्रसाद पिंगळे, शहर सरचिटणीस रवींद्र म्हाळसकर, वडगाव विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन बाळासाहेब म्हाळसकर, अरविंद पिंगळे, नारायण ढोरे, वसंत भिलारे, सोमनाथ काळे, गटनेते नगरसेवक दिनेश ढोरे, प्रवीण चव्हाण.

तसेच अॅड. विजय जाधव, किरण म्हाळसकर, दिलीप म्हाळसकर, शामराव ढोरे, माजी उपनगराध्यक्षा अर्चना म्हाळसकर, सुनिता भिलारे, विद्यार्थी आघाडी अध्यक्ष विकी म्हाळसकर, मावळ तालुका भाजपा प्रसिद्धी प्रमुख अनंता कुडे, क्रीडा आघाडी अध्यक्ष नामदेव वारींगे, युवा मोर्चा कार्याध्यक्ष शेखर वहिले, योगेश म्हाळसकर, खंडूशेठ भिलारे, शरद मोरे, नितीन कुडे, कल्पेश भोंडवे, शंकर भोंडवे.

राजेंद्र म्हाळसकर, अतुल म्हाळसकर, विनायक भेगडे, हरीश दानवे, श्रीकांत चांदेकर, समीर गुरव, महिला आघाडी सरचिटणीस वैशाली म्हाळसकर, सुनंदा म्हाळसकर, सविता सुराणा, अर्चना कुडे, श्रेया भंडारी, वैशाली वारींगे, प्रियांका भोंडवे, दिपाली ढोरे, दिपाली सुतार आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.