Vadgaon Maval: वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ कार्यकर्ते जाखुजी कुडे यांचे निधन

एमपीसी न्यूज – वडगाव मावळ येथील वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ कार्यकर्ते हभप जाखुजी बाप्पूजी कुडे (विणेकरी) (वय 94) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.

श्री पोटोबा महाराज काकडा आरती सोहळ्याचे ते माजी अध्यक्ष होते. ते विणेकरी असल्याने देवस्थानच्या सर्व कार्यात त्यांचा मोठा सहभाग होता. तसेच मढी (नगर) येथील कानिफनाथ महाराज धर्मशाळा बांधणे कामी त्यांचा मोलाचा वाटा होता.

त्यांच्या पाठीमागे एक मुलगा, दोन मुली, नातवंडे असा परिवार आहे. प्रगतीशील शेतकरी मारुती कुडे यांचे ते वडील तर गिरीश व खुशाल कुडे यांचे ते आजोबा होत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.