Vadgaon Maval : असवले शाळेत राजमाता जिजाऊ जयंती साजरी

एमपीसी न्यूज- महाराष्ट्राच्या इतिहासाला कलाटणी देणाऱ्या, सुराज्याची स्वप्न साकारणाऱ्या, स्वाभिमानी राजमाता जिजाऊ जयंती बाळराजे असवले इंग्लिश मिडियम स्कूल व माजी सरपंच चिंधू मारूती असवले हायस्कूलध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

जयंतीचे औचित्य साधुन गेस्टॅम्प या कंपनीच्या वतीने अनेक महापुरुषांच्या जीवनावर आधारित १२० पुस्तके शाळेला भेट देण्यात आली. शाळेतील विद्यार्थ्यांनी जिजाऊंची वेशभूषा परिधान करत आपल्या वकृत्व शैलीत त्यांचा जीवनप्रवास उलगडला.

यावेळी गेस्टॅम्प कंपनीचे मनुष्यबळ विकास अधिकारी अमित ओहोळ, स्टाफ ऑफिसर महेश शिंदे, सहाय्यक व्यवस्थापक निखिल दरेकर, संस्थेचे अध्यक्ष शिवाजी असवले, उपाध्यक्ष मनोज जैन, खजिनदार तानाजी असवले, सोमनाथ असवले, स्वामी जगताप, ग्रामविकास समिती अध्यक्ष राजाराम असवले, चेअरमन दत्ता घोजगे, उद्योजक अनिल असवले, दीपक शिंदे पालक शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते.

प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष शिवाजी असवले यांनी केले, पाहुण्यांचे स्वागत दीपमाला मॅडम यांनी केले. मुख्याध्यापक किरण हेंद्रे यांनी आभार मानले.

HB_POST_END_FTR-A2