Vadgaon Maval : ज्योती नलावडे ठरल्या सेल्फी काँटेस्टच्या “महादुर्गा”

एमपीसी न्यूज-  एसआरएम महिला फांऊडेशन व नगरसेविका सायली रुपेश म्हाळसकर यांच्या वतीने नुकत्याच नवरात्री उत्सवादरम्यान घेण्यात आलेल्या मी दुर्गा बेस्ट सेल्फी अँन्ड टिकटॉक कॉन्टेस्ट -2019 स्पर्धेत ज्योती नलावडे ठरल्या सेल्फी काँटेस्टच्या “महादुर्गा”. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा मावळगड कार्यालय येथे रविवारी (दि. 13) मोठ्या उत्साहात पार पडला. 

नवरात्री उत्सवादरम्यान देवीने परीधान केलेल्या ९ रंगाच्या ९ वेगवेगळ्या साड्या परिधान करून स्पर्धकांनी आपला आकर्षक सेल्फि व टिकटॉक व्हिडीओ पाठवून सहभाग नोंदवला होता.

यावेळी विशाखा लोंढे, शुभांगी महाजन, निरमा राजपुत, भाग्यश्री कराळे, निशा सरोदे, ज्योती नलावडे, अश्विनी दानवले, सुनीता तरळकर व राधा कारंडे या स्पर्धेतील 9 दिवसांच्या 9 दुर्गा विजेत्या ठरल्या तर या 9 दुर्गा स्पर्धकांमधून लकी ड्रॉ पद्धतीने “ज्योती नलावडे या  2019 -महादुर्गा ” विजेत्या ठरल्या.  सर्व विजेत्यांना यावेळी सोन्याची नथ, ट्रॉफी, पुष्पगुच्छ ,प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तर बेस्ट टिक -टॉक व्हिडोओ कॉन्टेस्ट -2019 च्या राधा कारंडे या प्रथम तर कल्याणी गायकवाड द्वितीय व सपना खंडेलवाल तृतीय क्रमांकाच्या मानकरी ठरल्या. त्यांना ट्रॉफी व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी स्पर्धेत सहभाग घेतलेल्या स्पर्धकांना आकर्षक भेटवस्तु व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले

या समारंभास वडगाव नगरपंचायतच्या नगरसेविका पूनम जाधव, शारदा ढोरे , जिजाबाई आगळे तसेच महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्पर्धेचे आयोजन सुषमा म्हाळसकर, मोहिनी म्हाळसकर, वर्षा म्हाळसकर, ज्योती शेलार, नेहा म्हाळसकर, आरती म्हाळसकर, साक्षी म्हाळसकर, पल्लवी वारींगे यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.