Vadgaon Maval: स्व. पै. केशवराव ढोरे प्रतिष्ठानचा यावर्षीचा सामुदायिक विवाह सोहळा रद्द

प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंढरीनाथ ढोरे व सोहळा समितीचे अध्यक्ष सुनील शिंदे यांची माहिती 

एमपीसी न्यूज –  वडगाव मावळ येथील स्व. पै. केशवराव ढोरे प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित केलेला सामुदायिक विवाह सोहळा यावर्षी कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव व लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंढरीनाथ ढोरे व सामुदायिक विवाह सोहळा समितीचे अध्यक्ष सुनील शिंदे यांनी दिली.

यासंदर्भात प्रतिष्ठानचे पदाधिकारी राजेंद्र वहिले, अर्जुन ढोरे, विलास दंडेल, राजेश बाफना, गणेश विनोदे, अतुल राऊत, अविनाश चव्हाण, अनिल कोद्रे, सदाशिव गाडे, रोहिदास गराडे, अरुण वाघमारे, शंकर ढोरे, शरद ढोरे, अजय धडवले, महेश तुमकर यांच्या उपस्थितीत घेण्यात आलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

प्रतिष्ठानच्या वतीने गेल्या सात वर्षांपासून सामुदायिक विवाह सोहळा हा समाजपयोगी उपक्रम राबविला जात असून यावर्षीही या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावर्षीही प्रतिष्ठानवर विश्वास दाखवून 21 जोडप्यांनी नावनोंदणी केली होती.

परंतु, संपूर्ण देशातील सद्यस्थिती पाहता कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व शासनाने पुकारलेले लॉकडाऊन तसेच, लॉकडाऊन स्थगित झाले तरी कोरोनाचा धोका लक्षात घेता जमावबंदी लागूच राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे यावर्षीचा सामुदायिक विवाह सोहळा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे ढोरे व शिंदे यांनी सांगितले.

 गोरगरीबांच्या सेवेसाठी कार्यरत राहू – पंढरीनाथ ढोरे 
लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य व गोरगरीब लोकांपुढे निर्माण झालेल्या अडचणी लक्षात घेऊन प्रतिष्ठानच्या वतीने लॉकडाऊनच्या पहिल्या टप्प्यात 15  दिवसात 5 हजार जेवणाचे डबे वाटप करण्याचा उपक्रम राबविण्यात आला असून यापुढेही या संकटात विविध उपक्रम राबवून गोरगरीबांच्या सेवेसाठी कार्यरत राहणार असल्याचे अध्यक्ष पंढरीनाथ ढोरे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.