BNR-HDR-TOP-Mobile

Vadgaon Maval : खंडूजी तिकोणे यांची काँग्रेस पक्षातून हकालपट्टी

0

एमपीसी न्यूज- आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मावळ विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करून बंडखोरी केल्यामुळे मावळ तालुका काँग्रेस पक्षाचे तालुका कार्याध्यक्ष खंडूजी तिकोणे यांची काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आलेली आहे. या बाबत मावळ तालुका काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष नितीन उर्फ बाळासाहेब ढोरे यांनी प्रसिद्धीपत्रक काढले आहे.

या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, मावळ तालुका काँग्रेस पक्षाचे तालुका कार्याध्यक्ष खंडूजी तिकोणे यांनी बंडखोरी करून आगामी विधानसभा निवडणुकीसाठी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. या संदर्भात निर्णय घेण्यासाठी मावळ तालुका काँग्रेस पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची एक बैठक सोमवारी (दि. 7) घेण्यात आली. या बैठकीत खंडूजी तिकोणे यांनी पक्षादेशाचे पालन न करता आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे सर्वानुमते त्यांची काँग्रेस पक्षातून हकालपट्टी करण्याचा निर्णय घेण्यात आला.

या बैठकीला काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत सातकर, माउली दाभाडे उपस्थित होते.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3