Vadgaon Maval : शहर भाजपाचे अध्यक्षपदी किरण भिलारे तर सरचिटणीसपदी रवींद्र म्हाळसकर

एमपीसी न्यूज- वडगाव शहर भाजपाचे अध्यक्षपदी किरण शंकरराव भिलारे व सरचिटणीसपदी रवींद्र बाळासाहेब म्हाळसकर यांची निवड करण्यात आली.

वडगाव येथील पक्षकार्यालयात पक्षाच्या मासिक बैठकीत पुणे जिल्हा भाजपाचे अध्यक्ष आमदार संजय उर्फ़ बाळा भेगडे यांनी ही निवड जाहीर केली. यावेळी ज्येष्ठ नेते केशवराव वाडेकर, तालुका अध्यक्ष प्रशांत ढोरे, प्रभारी भास्करराव म्हाळसकर, सभापती गुलाबराव म्हाळसकर, उपसभापती शांताराम कदम, महिला अध्यक्षा नंदाताई सातकर, युवक अध्यक्ष बाळासाहेब घोटकुले, शांताराम काजळे, नारायण ढोरे, अनंता कुड़े, रवींद्र घारे, सुमित्रा जाधव, अजित आगळे उपनगराध्यक्षा अर्चना म्हाळसकर, गतनेते दिनेश ढोरे, नगरसेवक दिलीप म्हाळसकर, किरण म्हाळसकर, सुनीता भिलारे, दीपाली मोरे, विजय जाधव आदीं उपस्थित होते.

किरण भिलारे हे यापूर्वी वडगाव शहर भाजपाचे सरचिटणीस म्हणून कार्यरत होते. तर ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज देवस्थानचे विश्वस्त म्हणून काम पाहात आहेत. भिलारे हे पक्षाचे अत्यंत निष्ठावंत व विश्वासू कार्यकर्ते असून उत्तम प्रशासक आणि संघटक आहेत.

यावेळी किरण भिलारे म्हणाले की भविष्यकाळात पक्ष संघटना मजबूत करून पक्षाची ध्येयधोरणे तळागाळातील समाजासाठी पोहोचविण्याचे काम करू. ‘सबका साथ सबका विकास’ या प्रमाणे काम करण्याचे आश्वासनही यावेळी त्यांनी दिले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.