Vadgaon Maval : पुणे जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरचिटणीसपदी किशोर सातकर

एमपीसी न्यूज- पुणे जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरचिटणीसपदी वडगाव मावळ येथील युवक कार्यकर्ते, उद्योजक किशोर पंढरीनाथ सातकर यांची निवड करण्यात आली आहे.

राष्ट्रवादी नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, दिलीप वळसे पाटील, प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते, जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे, जिल्हा युवक अध्यक्ष सचिन घोटकुले आदींच्या उपस्थितीत सातकर यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले.

किशोर सातकर हे कान्हे मावळ येथील प्रसिद्ध युवा उद्योजक असून तरूण वर्गामध्ये त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे. सातकर हे कान्हे ग्रुपग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य आहेत. उत्कृष्ट प्रशासक व संघटक म्हणून ते ओळखले जातात.

पक्षाची ध्येयधोरणे आणि सामाजिक समतेचे विचार, तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी तसेच संघटना बळकट करण्यासाठी अधिकाधिक वेळ देऊन काम करणार असल्याचे निवडीनंतर किशोर सातकर यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.