Vadgaon Maval : बाफना कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी घेतला कोकण सहलीचा आनंद

एमपीसी न्यूज- वडगाव मावळ येथील हरकचंद रायचंद बाफना डी. एड. कॉलेजच्या विद्यार्थ्यांची क्षेत्रभेट या उपक्रमांतर्गत मंगळवारी (दि. १८) मुरुड- जंजिरा, श्रीवर्धन, हरिहरेश्वर, दिवेआगर, रायगड व महाबळेश्वर या ठिकाणी शैक्षणिक सहल काढण्यात आली.

सहलीच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी कोकण किनाऱ्यावरील लोकजीवन तसेच तेथील परिसर याचा जवळून अभ्यास केला. जंजिरा व रायगड किल्यांचा इतिहास प्रत्यक्ष अनुभवयास मिळाला. प्राचार्य हिरामण लंघे यांचे मार्गदर्शन व प्रा.राजेंद्र डोके, प्रा.मनोज गायकवाड, प्रा.शीतल गवई, प्रा संध्या थोरात ,भालेकर मॅडम, नंदकुमार मुगेरा व सोमनाथ धोंगडे या सर्वांच्या सहकार्यामुळे सहल यशस्वीपणे पार पडली.

संस्थेचे अध्यक्ष तुकाराम असवले व सचिव अशोकजी बाफना यांनी या उपक्रमाबाबत प्राचार्य व सर्वांचे कौतुक केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.