Vadgaon Maval : जमिनीच्या व्यवहारात फसवणूक केल्याप्रकरणी चौघांना अटक

एमपीसी न्यूज- नाणे मावळातील उकसान गावातील जमिनीचे साठेखत करतो असे सांगुन नाणे गावातील भातशेतीचे खरेदीखत केल्याप्रकरणी कामशेत पोलिसांनी चार जणांना अटक केलीआहे.

सागर शांताराम आंद्रे ( वय २६ रा. नाणे ता. मावळ ), राजेश दत्तात्रय दाभने ( वय ३५ रा. कोंडीवडे ता. मावळ ) , विकी संजय गायकवाड ( वय २५ रा. कांबरे ता. मावळ ), ज्ञानेश्वर बबन चव्हान( वय २५ रा. कामशेत ता. मावळ ) अशी आरोपींची नावे असून त्यांना कामशेत पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी वसंत लक्ष्मण शिंदे ( वय ६७ रा. उकसान ता. मावळ ) या शेतकऱ्याने फिर्याद दिली आहे.

कामशेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी वसंत लक्ष्मण शिंदे यांच्या मालकीचे उकसान गावामध्ये ३ आर क्षेत्र आहे. त्याचे साठेखत करायचे आहे, असे सांगुन आरोपींनी वसंत शिंदे यांच्या मालकीच्या नाणे गावातील जमीन गट नं. 180/ब एकुण क्षेत्र ०० हे 80आर पैकी 40 आर या क्षेत्राचे दुय्यम निबंधक वडगाव येथील कार्यालयात खरेदीखत करुन घेतले.

यावेळी झालेल्या खरेदीखतामध्ये आरोपींना शरद सहकारी बँकेच्या कामशेत शाखेचे 5 धनादेश दिल्याचे व रोख रक्कम अदा केल्याचा उल्लेख केला आहे. परंतु सदर व्यवहारामध्ये कोणताही धनादेश अथवा रोख रक्कम दिलेली नाही. साठेखत करतो असे सांगुन खरेदीखत केले व आर्थिक फसवणूक केली व सातबारा सदरी स्वतःच्या नावाची नोंद केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बी बी पाटील करत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.