Vadgaon Maval : स्वर्गीय हभप आप्पासाहेब कराळे पाटील कीर्तन महोत्सवाचा समारोप

एमपीसी न्यूज- स्वर्गीय ह भ प आप्पासाहेब तथा ज्ञानोबा नामदेव कराळे पाटील भक्त परिवार व संत श्रेष्ठ सदगुरू निवृत्तीनाथ महाराज संस्थान त्र्यंबकेश्वर यांच्या संयुक्त विद्यमाने आप्पांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त कीर्तन महोत्सव आणि जगद्गुरू तुकाराम महाराज जीवन चरित्र कथा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाचा समारोप हभप बंडातात्या महाराज कराडकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने करण्यात आला. 
हभप बंडातात्या महाराज कराडकर यांनी निर्सग क्षेत्र, सामाजिक कार्य, हाडाचे वारकरी, व्यसनमुक्ती, तरूण पिढीने कोणत्या उंचीने काम केले पाहिजे अशा विषयावर वेगवेगळे दाखले देत प्रबोधन केले.
  • या कीर्तन महोत्सवानिमित्त संत श्रेष्ठ सदगुरु श्री निवृत्तीनाथ संस्थांनच्या मंदिर जिर्णोधारासाठी भंडारा डोगर ट्रस्टचे विश्वस्त ह.भ.प.रामभाऊ कराळे पाटील आणि परिवाराने 11 हजार रुपयांची देणगी दिली. या सोहळ्याकरिता आलेल्या भाविकांनी भंडारा डोंगराच्या मंदिरासाठी सुमारे ५ लाख रुपयांचा निधी संकलित केला. या कीर्तन महोत्सवाचा आणि अन्नदानाचा लाभ नाशिक आणि मावळ परिसरातून आलेल्या सुमारे दोन हजार भाविकांनी घेतला. रामभाऊ कराळे पाटील आणि परिवार यांच्यावतीने अन्नदान करण्यात आले.

या प्रसंगी भागवताचार्य हभप एकनाथ महाराज गोळेसर यांचा स्वर्गीय आप्पासाहेब कराळे पाटील कीर्तन महोत्सव आणि संत तुकाराम भक्त निवास भंडारा डोगंर यांच्या वतीने हभप बंडातात्या कराडकर यांच्या हस्ते मानपत्र शाल श्रीफळ देऊन सन्मान देण्यात आला.
  • काकडा आयोजन करणारे प्रमुख कापसे बाबा यांना परिवाराच्या वतीने सन्मानित  करण्यात आले. भंडारा डोगंर ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब काशिद यांनी स्वागत केले. सुत्रसंचालन हभप मनोहरपंत ढमाले मामा यांनी केले आभार शांताराम कराळे पाटील यांनी मानले.
यावेळी किसान संघाचे अध्यक्ष हभप शिवाजीराव पवार, सचिव जोपाशेठ पवार, वसंतराव कराळे,  दत्ताशेठ गाडे, सदाशिव आण्णा गाडे, शिवाजीराव कराळे , गोरख गाडे, किसनराव कराळे, दत्तोबा कराळे, गोरख गाडे, बाळासाहेब तु कराळे बाळासो नि. कराळे, माणिक गाडे, बाळासाहेब स. कराळे, नाटक पाटील, तानाजी कराळे, सुखदेव गाडे, सखाराम कराळे, धनजय गाडे, हभप दत्तात्रय गाडे, शोभाचंद काकंरीया, माजी सैनिक मारुती खराबी, आण्णा दाभाडे, रामभाऊ काळोखे, अमित शेलार, लक्ष्मण कराळे ,लक्ष्मण बोडके आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.