Vadgaon Maval : व्याख्याते विवेक गुरव यांना ‘युवा भूषण पुरस्कार’ जाहीर; रविवारी कोल्हापुरात होणार पुरस्कारचे वितरण

एमपीसी न्यूज – कोल्हापूर येथील जनकल्याण सामाजिक सेवा संस्थेच्या वतीने देण्यात येणारा ‘राज्यस्तरीय युवा भूषण पुरस्कार’साठी पुणे जिल्ह्यातील वडगाव मावळ येथील प्रसिद्ध व्याख्याते विवेक गोविंदराव गुरव यांची निवड केल्याचे जाहीर केले आहे. त्यांच्या कार्याची दाखल घेऊन त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.

ह्या पुरस्काराचे वितरण रविवारी (दि. 12 जानेवारी 2020 रोजी) राजमाता जिजाऊ तसेच स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त कोल्हापूर येथील शाहू महाराज स्मारक भवनात, दसरा चौक येथे आयोजित कार्यक्रमात केले जाणार आहे. कोल्हापुरी फेटा, शाल श्रीफळ, सन्मानचिन्ह आणि गौरवपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

_MPC_DIR_MPU_II

याआधी गुरव यांना 2018 रोजी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे जयंतीनिमित्त आदर्श व्याख्याता म्हणून खासदार श्रीरंग बारणे यांचे हस्ते पुरस्कार मिळाला. पुणे जिल्ह्यातील तेरा तालुक्यात जिल्हा परिषदेच्या माध्यमातून गावोगावी ‘स्वच्छता भारत मोहिम’ या विषयावर व्याख्याने दिली. त्याची दखल घेत 3 जून 2018 रोजी औरंगाबाद येथे राज्यस्तरीय श्री संत गाडगे महाराज पुरस्कार मिळाला.

मावळ तालुक्यात 31 डिसेंबर 2018 रोजी माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या वाढदिवसानिमित्त मावळरत्न पुरस्कार माजी मंत्री राम शिंदे ह्यांचे हस्ते मिळाला, असे अनेक पुरस्कार प्राप्त त्यांना झालेले आहेत.

ज्ञानविकास प्रबोधनी संस्थेच्या माध्यमातून (भाषण कौशल्य, संवाद कौशल्य प्रशिक्षण क्लासेस वर्ग) आतापर्यंत शंभर पेक्षा जास्त बॅचेस यशस्वी, 100 बॅचेसमध्ये 3000 पेक्षा जास्त वक्ते घडविणारी संस्था असा नाव लौकिक आहे. त्यामध्ये नगरसेवक, उद्योजक, पंचायत समिती सभापती, उपसभापती, जिल्हा परिषद सदस्य, सरपंच, उपसरपंच सदस्य आदींचा समावेश आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.