Vadgaon Maval : पावसाळ्यापूर्वी महावितरणने कामे पूर्ण करावीत – सुनिल शेळके

एमपीसी न्यूज – वीज वितरण संबंधित असलेल्या विविध कामांचा आढावा घेण्यासाठी महावितरणच्या अधिकाऱ्यांसमवेत शासकीय विश्रामगृह वडगाव मावळ येथे बैठक संपन्न झाली. (Vadgaon Maval) यावेळी अखंडित वीजपुरवठा होण्यासाठी देखभाल दुरुस्तीची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावीत, अशा सूचना आमदार सुनिल शेळके यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

बैठकीसाठी कार्यकारी अभियंता संदीप दरवडे, उपकार्यकारी अभियंता संदीप दारमवार, विष्णू पवार, विवेक सूर्यवंशी, राजेंद्र गोरे, सागर बोडके आदि उपस्थित होते.

Pune : बेरोजगारांसाठी आनंदाची बातमी; प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी होणार रोजगार मेळावा

डीपीसी अंतर्गत मंजूर असलेल्या कामांना तात्काळ सुरुवात करण्यात यावी. तालुक्यातील अनेक गावांमध्ये कमी दाबाने वीजपुरवठा होत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून येत आहेत. याची दखल घेऊन वीज पुरवठा सुरळीत करावा.

सामान्य नागरिकांना महावितरणशी संबंधित असलेल्या अडचणींचा सामना करावा लागणार नाही, यासाठी कमी क्षमतेचे ट्रान्सफॉर्मर, जळालेले डिस्ट्रीब्यूशन बॉक्स, जीर्ण विद्युत खांब, विद्युत तारा बदलण्यात याव्यात. तालुक्यातील आदिवासी, कातकरी वस्तीवर काही ठिकाणी आजही वीज पोहचलेली नाही.(Vadgaon Maval) अशा ठिकाणी वीज पोहचविण्यासाठी प्रयत्न करावेत. अखंडित वीजपुरवठा होण्यासाठी देखभाल दुरुस्तीची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावीत, अशा सूचना आमदार शेळके यांनी बैठकीत दिल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.