Vadgaon Maval : ‘कुपोषणमुक्त मावळ’ अन् ‘सुदृढ भारत’ हेच आमचे भविष्यातील लक्ष -सुधाकर शेळके

एमपीसी न्यूज – ‘कुपोषणमुक्त मावळ’ अन् ‘सुदृढ भारत’ हेच आमचे भविष्यातील लक्ष आहे. मावळातील वय वर्ष 1 ते 6 वर्षे वयोगटातील प्रत्येक बालक कुपोषणमुक्त होऊन ‘सुदृढ व निरोगी बालक स्पर्धा’ आयोजित करण्याची इच्छा उद्योजक सुधाकर शेळके यांनी ग्रामीण रुग्णालय वडगाव मावळ कान्हे येथे आयोजित कुपोषित बालकांसाठीचे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिराच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना व्यक्त केली .

ग्रामीण रुग्णालय वडगाव मावळ कान्हे येथे राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत एक ते सहा वर्षे वयोगटातील कुपोषित बालकांसाठीचे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिराचे आयोजन आमदार सुनील अण्णा शेळके यांच्या मार्गदर्शनाने व विशेष सहकार्याने तसेच डॉक्टर गणपत गेनुजी जाधव अधीक्षक ग्रामीण रुग्णालय वडगाव मावळ कान्हे यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आले होते.

शिबिरात सहभागी 263 बालकांची बालरोग तज्ञामार्फत मोफत आरोग्य तपासणी करून आवश्यक औषधोपचार त्यांना तात्काळ देण्यात आला. सहभागी सर्व लाभार्थी बालक-पालक अंगणवाडी पर्यवेक्षिका,सेविका, मदतनीस यांना आहाराचे नियोजन करण्यात आले होते. याप्रसंगी पौष्टिक लाडू प्रत्येक बालकास देण्यात आला .

मावळ तालुका कुपोषणमुक्त व्हावा, या हेतूने माननीय आमदार महोदयांच्या संकल्पनेतून व सहकार्यातून सहभागी लाभार्थ्यांना विशेष पूरक आहाराचे वाटप करण्यात आले .तसेच इनरव्हील क्लब तळेगाव दाभाडे यांच्या वतीने सहभागी बालकांना खाऊवाटप करण्यात आला. ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’, ‘राष्ट्रीय कन्या सप्ताह’मध्ये मुलीच्या जन्माचे स्वागत, मुलगी शिकली पाहिजे हा संदेश व महिलांवरील अत्याचाराला वाचा फोडणे,कौटुंबिक हिंसाचार कायदा याबाबतही जनजागृती केली.

याप्रसंगी शरदचंद्र माळी गटविकास अधिकारी मावळ, डॉक्टर लोहारे तालुका आरोग्याधिकारी मावळ मा.वासनिक बाल विकास प्रकल्प अधिकारी मावळ, विजय सातकर सरपंच कान्हे, गिरीश सातकर उपसरपंच कान्हे यांची विशेष उपस्थिती व मार्गदर्शन लाभले.

बालक व पालक यांना आरोग्यविषयक विशेष जनजागरण करण्याचे नियोजन सेवाधाम ट्रस्ट तळेगाव दाभाडे यांनी केले. तसेच मायमर मेडिकल कॉलेज तळेगाव यांचे बालरोग तपासणीसाठी विशेष सहकार्य मिळाले .

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व प्रमुख उपस्थितांचे स्वागत डॉक्टर गणपत गेनुजी जाधव वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय वडगाव मावळ कान्हे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर गुणेश बागडे व डॉ. पद्मवीर थोरात यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.