Vadgaon Maval: कुपोषण मुक्त मावळ अभियानास सुरुवात

Vadgaon Maval: Malnutrition Free Maval Campaign Launched मावळ तालुक्यातील ६० मध्यम कुपोषित बालकांना पंचायत समिती मावळ येथे पूरक पोषण आहाराचे वाटप करण्यात आले.

एमपीसी न्यूज- मोदी सरकार 2.0 प्रथम वर्षपूर्ती निमित्ताने जनसंपर्क अभियानांतर्गत मावळ तालुक्यातील ६० मध्यम कुपोषित बालकांना पंचायत समिती मावळ येथे पूरक पोषण आहाराचे वाटप करण्यात आले.

प्रातिनिधिक स्वरूपात हे आहार किट पर्यवेक्षिका यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले.

यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे, सहाय्यक गटविकास अधिकारी लक्ष्मण वाजे, गटशिक्षणाधिकारी मंगला वाव्हळ, कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद पुणेचे बोरकर, पंचायत समिती सदस्य, विभागप्रमुख, अंगणवाडी पर्यवेक्षिका, अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

भूषण मुथा यांच्या या स्तुत्य उपक्रमाबाबत समाधान व्यक्त करत या पूरक पोषण आहारामुळे लवकरच ही सर्व बालके आणि पर्यायाने मावळ तालुका कुपोषण मुक्त होईल, असे मत माजी सभापती गुलाब म्हाळसकर यांनी व्यक्त केले.

हा आहार एक महिन्यासाठी पुरेल इतका असून या आहारामध्ये साजूक तूप, गूळ, शेंगदाणा, वेलची युक्त पौष्टिक लाडू, प्रोटीन युक्त रेडी टू कूक दाल खिचडी किट, पारले बिस्कीट असे या पूरक पोषण आहाराचे स्वरूप असून हा आहार बालकांना संबंधित अंगणवाडी सेविकांच्या मार्फत घरपोच दिला जाणार आहे, अशी माहिती एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प अधिकारी मावळ महेंद्र वासनिक यांनी दिली.

याप्रसंगी पंचायत समितीचे उपसभापती दत्तात्रय शेवाळे, सुवर्णा कुंभार, माजी उपसभापती शांताराम कदम, जिजाबाई पोटफोडे, पंचायत समिती सदस्य ज्योती शिंदे, राजश्री राऊत, नवनियुक्त गटविकास अधिकारी एस.पी.भागवत, मावळते गटविकास अधिकारी शरदचंद्र माळी, वडगांव शहर भाजपचे अध्यक्ष किरण भिलारे, कार्याध्यक्ष प्रसाद पिंगळे, मावळ तालुका भाजप प्रसिद्धी प्रमुख अनंता कुडे, पदवीधर मतदार नोंदणी प्रमुख कल्पेश भोंडवे, विद्यार्थी आघाडी अध्यक्ष विकी म्हाळसकर उपस्थित होते. वडगाव शहर भाजप व्यापारी आघाडी अध्यक्ष भूषण मुथा यांचे चिरंजीव तनिष्क याच्या वाढदिवसानिमित्त या पूरक पोषण आहाराचे वाटप करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.