Vadgaon Maval : मोबाईल टॉवरवरील दहा लाखांचे साहित्य चोरीला

एमपीसी न्यूज – मोबाईलच्या टॉवरवरील दहा लाख 25 हजार रुपयांचे साहित्य अज्ञात चोरटयांनी चोरून नेले. ही घटना मावळ तालुक्यातील वडेश्वर आणि टाकवे येथे 26 ते 29 सप्टेंबर रोजी घडली.

संजय चंद्रभूषण पाठक (वय 40, रा. माऊलीनगर, साई पार्क, दिघी) यांनी याप्रकरणी वडगाव मावळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मावळ तालुक्यातील वडेश्वर आणि टाकवे येथे एअरटेल आणि वोडाफोन कंपन्यांचे टॉवर आहेत. त्या टॉवरवरती लावण्यात आलेले साहित्य अज्ञात चोरट्यांनी 26 ते 29 सप्टेंबर दरम्यान रात्री दहा ते बारा वाजण्याच्या सुमारास चोरून नेले. यामध्ये सहा लाख रुपये किमतीचे नोकिया कंपनीचे सहा टीआरएक्स, तीन लाख रुपये किमतीचे नोकिया कंपनीचे चार ड्युप्लेक्सर आणि सव्वा लाख रुपये किमतीचा एक इस्मा असे एकूण 10 लाख 25 हजार रुपये किमतीचे साहित्य चोरून नेले. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला असून वडगाव मावळ पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.