Vadgaon Maval :मावळ फेस्टीव्हल शुक्रवारपासून तीन दिवस रंगणार

एमपीसी न्यूज- कला, क्रीडा आणि संस्कृतीचा खजिना असलेला मावळ फेस्टीव्हल शुक्रवार दि 27 ते रविवार दि. 29 डिसेंबर दरम्यान रंगणार असुन तीन दिवस चालणाऱ्या फेस्टिव्हलमध्ये विविंध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती फेस्टीवलचे संस्थापक व नगरसेवक प्रवीण चव्हाण, अध्यक्ष सागर जाधव व कार्यक्रम प्रमुख महेंद्र म्हाळसकर यांनी दिली.

वडगाव मावळ येथील पोटोबा महाराज मंदिराच्या प्रांगणात होणा-या या कार्यक्रमात शुक्रवारी (दि 27) संध्याकाळी 4 वाजता महिलांसाठी स्पर्धात्मक ‘खेळ रंगला पैठणीचा’ हा कार्यक्रम होणार असुन या कार्यक्रमाला ‘लागीर झालं जी’ फेम या मालिकेतील नायिका शितली (शिवानी बावकर) ह्या उपस्थित राहणार आहे. सिनेअभिनेते क्रांतीनाना मळेगावकर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहेत. प्रत्येक सहभागी स्पर्धकांस प्रविण सुहाना अंबारी यांचेकडून आकर्षक भेट वस्तू दिली जाणार आहे. विजेत्या प्रथम तीन महिलांना अनुक्रमे मानाची पैठणी, सोन्याची नथ व चांदीचा छल्ला अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत. लहान मुलांसाठी फनफेअर होईल.

_MPC_DIR_MPU_II

मावळ फेस्टीवलचे उद्घघाटन शनिवारी (दि 28) संध्याकाळी साडेपाच वाजता विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या हस्ते होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणुन मावळचे खासदार श्रीरंग बारणे, कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मावळचे आमदार सुनील शेळके हे असून माजी मंत्री बाळा भेगडे हे उपस्थित राहणार आहेत.

यावेळी सुरेशभाई शहा यांना ” जीवनगौरव”, शंकरराव शेलार यांना “कृषीरत्न”, तळेगाव दाभाडे येथील कलापिनी या संस्थेला “कलागौरव” पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. त्यानतंर धुमधडाका हा सुपर हिट गाण्यांचा कार्यक्रम होणार आहे.

रविवारी (दि. 29) दुपारी 2 ते 4 दरम्यान देशी गायीचे प्रदर्शन व गोपालकांचा सन्मान होणार असुन संध्याकाळी 4 वाजता समाज प्रबोधनकार हभप निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर) यांचा कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.