_MPC_DIR_MPU_III

Vadgaon Maval : मावळ प्रबोधिनी यांच्या वतीने कान्हेफाटा येथे उद्या सामुदायिक विवाह सोहळा

एमपीसी न्यूज – मावळ तालुका सामुदायिक विवाह सोहळा समिती व मावळ प्रबोधिनी यांच्या वतीने कान्हे फाटा येथे उद्या बुधवारी (दि 24) सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात 135 नववधू जोडपी विवाहबद्ध होणार आहेत. मावळ प्रबोधिनीचे संस्थापक व मुख्य आयोजक रवींद्र आप्पा भेगडे, रोहिदास महाराज धनवे, रवी शेटे, नगरसेवक अमोल शेटे, नगरसदस्य रघुवीर शेलार, नंदकुमार भसे, नाथा महाराज शेलार, विठ्ठल घारे यांनी या सोहळ्याची माहिती दिली.

_MPC_DIR_MPU_IV

कान्हे फाटा येथील भक्ती-शक्ती संगम येथे बुधवारी सायंकाळी साडेसहा वाजता हा सोहळा होईल. या सोहळ्यात व-हाडी मंडळींसाठी सुमारे 35 एकर जागेत भव्य मंडप उभारण्यात आला आहे. हिंदू धर्म संस्कृतीप्रमाणे हा विवाह सोहळा होईल. वधू वरास प्रत्येकी तीन पोशाख व साडया, संसारोपयोगी भांड्यांचा संच, गॅस शेगडीसह गॅस कनेक्शन देण्यात येणार आहे. तसेच दहा लकी ड्रॉ काढण्यात येणार असून त्यात भाग्यवान जोडप्यांना मारूती सुझुकी अल्टो मोटार, तीन गीर जातीच्या देशी गायी, सहा लॅपटॉप आदी भेट म्हणून देणार आहेत. अशी माहिती मुख्य आयोजक रवींद्र आप्पा भेगडे यांनी दिली.

_MPC_DIR_MPU_II

व-हाडी मंडळींसाठी 35 एकर जागेत मंडप, पार्किंग, भोजन तसेच रुग्णवाहिका, प्रथमोपचार व्यवस्था, सीसीटीव्ही व्यवस्था करण्यात आली आहे. सामुदायिक विवाह सोहळा समितीचे अध्यक्ष हभप रोहिदास महाराज धनवे, मावळ युवा प्रबोधिनीचे अध्यक्ष रवी शेटे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्ते सोहळ्याचे संयोजन करत आहेत.

वारकरी संप्रदायाच्या पुढाकाराने विवाह सोहळ्यातील अनिष्ट प्रथा, रूढी व परंपरा यांना फाटा देत वेळ व पैशाची बचत करण्याच्या दृष्टीने या सोहळ्याचे आयोजन केले जात आहे. भक्ती- शक्ती युवा मंच, पवन मावळ विवाह सोहळा समिती, मावळ प्रबोधिनी यांच्या वतीने गेल्या पाच वर्षांपासून सामुदायिक विवाह सोहळे आयोजित केले जात आहेत. या समाजाला सुधारण्यासाठी सामाजिक सुधारकांचा आदर्श डोळ्यासमोर राहावा तोच आदर्श घेऊन चला सुरूवात करू पुन्हा एका नव्या बदलाची वेळ, पैसा दोन्ही महत्त्वाचे जमेल तेवढे वाचवू आणि विवाह सोहळ्याची पावित्र्यता वाढवू असे सांगत या विवाहसोहळ्याला जास्तीतजास्त नागरिकांनी उपस्थित राहून वधू वरास शुभाशीर्वाद द्यावेत असे आवाहन करण्यात आले आहे.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.