Vadgaon Maval : मावळ लीग टी 20 स्पर्धेत ड्रीम टीमला विजेतेपद

मॅन आॅफ द सिरीज ( पिंक कॅप) राहुल असबे उत्कृष्ट गोलंदाज ( पर्पल कॅप) शैलेश वहिले

एमपीसी न्यूज- प्रशांत वहिले प्रतिष्ठान व क्रिकेट क्लबच्या वतीने आयोजित मावळ क्रिकेट लीग टी 20 जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेत ड्रीम टीम संघाने विजेतेपद पटकावले तर उपविजेतेपदावर प्रशांत वहिले क्लबने आपले नाव कोरले. ग्रामीण भागातील क्रिकेटप्रेमीनां वाव मिळावा, या उद्देशाने पुणे जिल्ह्यात प्रथमच गुलाबी चेंडूवर वेदांत ग्राउंड परंदवाडी येथे स्पर्धा घेण्यात आली.

स्पर्धेत जिल्ह्यातील एकूण 16 संघानी सहभाग घेतला व एकूण 32 सामने झाले. पंच म्हणून पवन पाली, घोरपागर, पेंडसे यांनी काम पाहिले. या स्पर्धेत ड्रीम टीमने प्रथम क्रमांक, प्रशांत वहिले क्लबने द्वितीय क्रमांक, देहु क्लबने तृतीय क्रमांक, सेंन्ट्रल रेल्वे पुणे यांनी चतुर्थ क्रमांक पटकावला. या स्पर्धेत सिरिजमध्ये वैयक्तिक कामगिरी करणारे खेळाडू राहुल असबे (मॅन आॅफ द सिरीज पिंक कॅप), शैलेश वहिले ( सिरीज उत्कृष्ट गोलंदाजी पर्पल कॅप), अमेय जाधव ( सिरीज उत्कृष्ट फलंदाज), अमोल ठोंबरे ( उत्कृष्ट विकेट किपर) , नेहाल ( उत्कृष्ट फिल्डर ) जेसीबी ( उत्कृष्ट संघ) यांनी संपूर्ण स्पर्धेतील बक्षीस पटकविले .

स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभ राजेश ढोरे, विवेक गुरव सर, संजय दंडेल, संतोष थिटे सर, मंगेश खैरे, सतीश पाटील, शैलेश ढोरे आदींच्या उपस्थितीत करण्यात आला.यावेळी शैलेश वहिले, रोहित गिरमे, संदीप ढोरे, मयूर वाघमारे, प्रशांत जाचक, रोशन मोरे, पुरंदर शेट्टी, लखन आंबेकर, दत्ता पवार, प्रतीक भाटीया, मयूर अवचट, प्रफुल चौधरी, मंगेश वाघमारे, सचिव अमोल ठोंबरे, कार्यक्रम प्रमुख किरण धाडवे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्याध्यक्ष संतोष खैरे यांनी केले. आभार अध्यक्ष रोहित गिरमे यांनी मानले.

या स्पर्धेत नगरसेवक राजेंद्र कुडे, किरण म्हाळसकर, राहुल ढोरे, सायली म्हाळसकर, उद्योजक अनिल मालपोटे, शामराव ढोरे, स्वप्नील अशिष परदेशी मंगेश देशमुख, रजनीश ढोरे, अशोक पडवळ, संदीप देवकर, नितीन बाफणा, मयुर अवचट, धामणकर यांनी विशेष सहकार्य केले. तसेच या स्पर्धेत मणिभद्र मोबाईल शॉपी, प्रितम दुमावत, गुरुकृपा हाॅटेल यांच्याकडुन आकर्षक बक्षीस ठेवण्यात आले.

संक्षिप्त धावफलक :

ड्रीम टीम 20 षटकात सर्वबाद 187 ( हरि सावंत – 91, अमय जाधव -52, शैलेश वहिले -3/20, प्रशांत जाचक -3/25) विजयी वि पराभूत प्रशांत वहिले क्लब 14.5 षटकात सर्वबाद 122 (आनंद चव्हाण – 66, नेहाल -29, अमय जाधव- 3/27, हरी सावंत 2/26)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.