Vadgaon Maval: पेट्रोल- डिझेल दरवाढीचा मावळ तालुका काँग्रेसकडून निषेध

Vadgaon Maval: Maval taluka Congress protests against petrol-diesel price hike गेल्या काही दिवसात डिझेल 11 रूपयांनी तर पेट्रोल 9 रूपयांनी महागले आहे.

एमपीसी न्यूज- देशभरात आधीच लाकडाऊनमुळे आर्थिक संकटाचा सामना नागरिकांना करावा लागत होता. आता अनलॉक होत असून सर्व व्यवहार सुरळीत होत असतानाच गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल व डिझेलच्या दरात सातत्याने दरवाढ होत आहे. त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. त्यामुळे या दरवाढीचा निषेध करून ही दरवाढ तात्काळ मागे घ्यावी, अशी मागणी मावळ तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीने निवेदन देऊन करण्यात आली आहे.

याचा फटका सर्वसामान्य नागरिक, शेतकरी वर्ग, व्यापारी वर्ग, उद्योगसमूह यांना बसत असून महागाईची समस्या या दरवाढीमुळे प्रचंड उद्भवली आहे. याचा जाहीर निषेध म्हणून मावळ तालुका काँग्रेसच्या वतीने तहसिलदार मधुसूदन बर्गे यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी मावळ तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब ढोरे, कार्याध्यक्ष खंडू तिकोणे, युवक अध्यक्ष विलास मालपोटे, महिला आघाडी अध्यक्षा सिमा आनंदे, वडगाव शहर अध्यक्ष गोरख ढोरे, नगराध्यक्ष मयूर ढोरे, गणेश काजळे, शांताराम लष्करी, सहादु आरडे, शांताराम नरवडे, सुधीर भोंगाडे, संपत दाभाडे, शरद ढोरे उस्मान इनामदार, सोमनाथ असवले, सतिश ढोरे, यशवंत शिंदे, सिद्धेश ढोरे आदी उपस्थित होते.

निवेदनात म्हटले आहे की, देशभरातील नागरीक आधीच लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचणीत सापडले आहेत. आता कुठे व्यवहार सुरळीत होऊ लागले तर लगेच इंधन दरवाढ झाली. गेल्या काही दिवसात डिझेल 11 रूपयांनी तर पेट्रोल 9 रूपयांनी महागले आहे.

ही दरवाढ म्हणजे आधीच अडचणीत असलेल्या नागरिकांच्या समस्या वाढविणारी असल्याने ही दरवाढ तात्काळ मागे घ्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.