Vadgaon maval : इंधन दरवाढीच्या निषेधार्थ मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस महिलांच्या वतीने पंतप्रधानांना पाठवल्या गोवऱ्या

एमपीसी न्यूज – केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल, गॅस व खाद्यतेल यासारख्या जीवनावश्यक वस्तूंच्या भरमसाठ किमती वाढवून सर्वसामान्य जनतेला महागाईच्या खाईत लोटले आहे. सर्वसामान्य जनतेचे जगणे अवघड झाले असल्याचा ठपका ठेवत या दरवाढीच्या निषेधार्थ शनिवारी (दि. 4) मावळ तालुका राष्ट्रवादी महिलांच्या वतीने आंदोलन करण्यात आले. या वेळी आंदोलनकर्त्या महिलांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वडगाव मावळ पोस्ट कार्यालयातून पोस्टाने  गोवऱ्या पाठवल्या.

राष्ट्रवादी महिला तालुकाध्यक्ष  सुवर्णा राऊत यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.

या वेळी महिलांनी तीव्र शब्दात केंद्र सरकार व पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात घोषणा दिल्या. उज्वला योजनेच्या नावाखाली महिलांच्या डोळ्यात अश्रू आणले आहे. आता गोवऱ्यावर स्वयंपाक करण्याची वेळ आली आहे,  अशा भावना महिला पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केल्या.

या वेळी वडगाव नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षा पूजा वहिले तसेच रुपाली  दाभाडे,  वैशाली  दाभाडे, विणा  करंडे, पुष्पा  घोजगे, शीतल हगवणे, सुनीता काळोखे, वैशाली टिळेकर, सुप्रिया पिंजण, शशिकला सातकर, पूनम लगाडे, मनीषा भसे, कल्याणी काजळे, रंजना सातकर, नीलिमा शिंदे, शैलजा काळोखे, आदिका तनपुरे, कलिका घुले, हेमा रेड्डी, सविता मंचरे, उषा सातकर, विद्या मोहिते, नेहा सातकर, आशा सातकरसह  बहुसंख्येने महिला उपस्थित होत्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.