Vadgaon Maval : मावळ तालुका वारकरी संप्रदाय मंडळातर्फे आळंदीला जाणा-या वारकरी बांधवाचे स्वागत

एमपीसी न्यूज- श्री संत ज्ञानेश्वर महाराज समाधी संजीवन सोहळ्यानिमित्त आळंदीला जाणा-या सर्व वारकरी बांधवाचे स्वागत मावळ तालुका वारकरी संप्रदाय मंडळातर्फे करण्यात येत आहे.

आज, बुधवार (दि 20) व गुरुवार (दि. 21) रोजी सकाळी 7 ते 12 व दुपारी 3 ते 7 या वेळेत जांभुळफाटा वडगाव मावळ येथे वारकऱ्यांसाठी चहा,पाणी व नाष्ट्याची व्यवस्था करण्यात आली आहे. सर्व वारकरी बांधवांनी याचा लाभ घ्यावा तसेच वारकऱ्यांच्या स्वागतासाठी सर्व मावळ तालुक्यातील गायनाचार्य, मृदुंगाचार्य, किर्तनकार, प्रवचनकार व राजकीय सामाजिक सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

यावेळी मावळ तालुका वारकरी संप्रदाय मंडळाचे अध्यक्ष हभप नंदकुमार भसे, पदाधिकारी हभप नाथामहाराज शेलार, सुनीलमहाराज वरघडे, हभप रामदास पडवळ, हभप भरत येवले, हभप दिलीप वावरे, हभप संतोष शेलार, हभप शांताराम गायखे, हभप दत्तात्रय हजारे, हभप ज्ञानेश्वर जगताप, हभप नितीन आडीवळे, हभप दीपक वारींगे, हभप सुभाष देशमुख, हभप बजरंग घारे, हभप हनुमंत थोरवे, हभप बाळोबा वारींगे, हभप एकनाथ भानुसघरे, हभप सुखदेव गवारी, हभप बंडू कदम, हभप सदाशिव पेटकर, हभप भाऊ रासे, प्रभाकर तुमकर आदी पदाधिकारी उपस्थित राहिले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like