BNR-HDR-TOP-Mobile

Vadgaon Maval : मावळ तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेस सचिवपदी पुष्पा रमेश घोजगे

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज- मावळ तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेस सचिवपदी इंदोरी येथील कार्यकर्त्या पुष्पा रमेश घोजगे यांची रविवारी (दि 6) नियुक्ती करण्यात आली.

यावेळी पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप गारटकर, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे, मावळ तालुका कार्याध्यक्ष दीपक हुलावळे, जिल्हा युवक अध्यक्ष सचिन घोटकुले, जिल्हा परिषद सदस्य बाबुराव वायकर, मावळ तालुका युवक अध्यक्ष सुनील दाभाडे, पुणे जिल्हा सहकारी बँकेच्या उपाध्यक्षा अर्चना घारे, जिल्हा परिषद सदस्या शोभाताई कदम आदी उपस्थित होते. पक्षाच्या बैठकीत तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सुवर्णा राऊत यांनी पुष्पा घोजगे यांची निवड जाहीर करून तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे व जिल्हाध्यक्ष गारटकर यांचे हस्ते त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.

पुष्पा घोजगे ह्या तनिष्का महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालिका असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी असलेली त्यांची बांधीलकी आणि सामाजिक, राजकीय क्षेत्रात केलेल्या प्रामाणिक कार्याची दखल घेऊन त्यांची सचिव पदावर नियुक्ती करण्यात आल्याचे पत्रकात म्हटले आहे.

तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संघटना अधिकाधिक मजबूत करण्यासाठी अधिकाधिक वेळ देऊन काम करणार असल्याचे निवडीनंतर घोजगे यांनी सांगितले. त्यांच्या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

HB_POST_END_FTR-A4

.