_MPC_DIR_MPU_III

Vadgaon Maval : मावळ तालुका निवड चाचणी व सी.एम.चषक कुस्ती स्पर्धेत दीडशे कुस्तीगीरांचा सहभाग

एमपीसी न्यूज- मावळ तालुका कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने आढे ग्रामस्थ व मावळ तालुका भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या संयुक्त विद्यमाने कै. गोविंद कारके यांच्या समरणार्थ मावळ तालुका निवड चाचणी व सी.एम. चषक कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत दीडशे कुस्तीगीरांनी सहभाग घेतला.

_MPC_DIR_MPU_IV

मावळ तालुका निवड चाचणी व सी.एम. चषक कुस्ती स्पर्धेत विकास येनपुरे, संदीप गराडे यांनी महाराष्ट्र केसरी गटात तर विपुल आडकर, अतिश आडकर, वैष्णव आडकर, अभिषेक हिंगे, तुषार येवले, सुरेश आडकर, आकाश पडवळ, अक्षय कारके, अनिल कडू, केतन घारे, समीर घारे, संजय आडकर, प्रतीक शिंदे, राकेश सुतार, संकल्प चांदेकर, तेजस कारके, ओंकार भोते, अमित सुतार, कौशल घोटकुले यांनी आपापल्या वजनी गटात विजेतेपद पटकाविले असून, सुरेश आडकर हा सी.एम. चषकाचा मानकरी ठरला आहे. विजेता संघ वाघोली येथे होणाऱ्या पुणे जिल्हा निवड चाचणी कुस्ती स्पर्धेसाठी जाणार आहे.

स्पर्धेचे उद्घाटन ऑलंपिकवीर व महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषेदेचे सहयोगी उपाध्यक्ष मारुती आडकर, ज्येष्ठ नेते पै. चंद्रकांत सातकर, जिल्हा परिषद नितीन मराठे, भाजपाचे तालुकाध्यक्ष प्रशांत ढोरे, युवा मोर्चाचे अध्यक्ष बाळासाहेब घोटकुले, उपाध्यक्ष अविनाश गराडे नगरसेवक सुनील शेळके, संदीप शेळके, मावळ तालुका कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष पै. संभाजी राक्षे, उपाध्यक्ष पै. खंडू वाळूंज, सचिव पै. बंडू येवले, पै. तानाजी कारके, पै.अंकुश सुतार, सुभाष ठाकर, गणपत कारके, गणेश सुतार यांच्या हस्ते करण्यात आले. तर बक्षिस समारंभ पुणे जिल्हा युवा मोर्चाचे अध्यक्ष सुदर्शन चौधरी, मावळ पंचायत समितीचे सभापती गुलाबराव म्हाळसकर, उपसभापती शांताराम कदम, जितेंद्र बोत्रे, गणेश भेगडे, यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ऑलंपिकवीर पै. मारुती आडकर यांना क्रीडा महर्षी व राष्ट्रीय कुस्तीगीर पै. खंडू वाळुंज यांना युवा क्रीडा रत्न पुरस्काराने गौरविण्यात आले.

स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे 

( कुमार विभाग 14 वर्षाखालील )

25 किलो:-  संकल्प चांदेकर (आढलेखुर्द),  अथर्व गायकवाड (चांदखेड),

28 किलो:-  तेजस कारके (आढे),  सनी ननावरे (टाकवे),

32 किलो:- ओंकार भोते (परंदवंडी),  सुमित आडकर (शिवली),

35 किलो:-  श्री शिंदे (टाकवे), पवन भोईर (आढलेखुर्द),

38 किलो:- कौशल घोटकुले (आढले बुद्रूक)  प्रणव चांदेकर (आढलेखुर्द)

42 किलो:- वैष्णव आडकर (शिवली),  सुजल वाळुंज (शिवणे)

( कुमार विभाग 17 वर्षाखालील )

45किलो:- अभिषेक हिंगे (पिंपळखुटे),  आदित्य सावंत (गोडूंब्रे),

48 किलो:- राकेश सुतार (आढे),  सतिश मालपोटे (फळणे),

51 किलो:- समीर घारे (येलघोल), मयूर काकडे (टाकवे),

55 किलो:-  विपुल आडकर (शिवली),  गौरव भेगडे (तळेगाव)

६० किलो:- दिलीप कालेकर (काले), सोहम जांभुळकर (जांभूळ)

65 किलो:- विकास भांगरे (मळवंडीठुले),  दीप शेटे (नाणे)

71 किलो:-ओंकार गराडे (धामणे),  शंभूराज पोटे (तळेगाव)

80 किलो:- नयन गाडे (कान्हे),  अंकित करवंदे (कल्हाट)

९२ किलो:- संजय आडकर (शिवली),  अनिकेत आडकर (शिवली)

110 किलो:- सागर शेलार (कार्ला)

( वरिष्ठ माती विभाग )

_MPC_DIR_MPU_II

57 किलो:- १) केतन घारे (सडवली), २)रोहन जगताप (कशाळ),

61 किलो:- १) अमित सुतार (आढे), २) शुभम शेलार (भाजे)

65 किलो:- १) भाऊ आखाडे (शिळींब), २) श्रीकांत सावंत (गोडुंब्रे)

70 किलो:-  संकेत रसाळ (शिवणे),  अक्षय पिंगळे (टाकवे)

74 किलो:-  नागेश राक्षे (सांगवडे),  विशाल येवले (शिवली)

79 किलो:-  तूूषार येवले (आढलेखुर्द),  सागर आडकर (शिवली)

86 किलो:-  सुरेश आडकर (शिवली),  संदीप आखाडे (शिळींब)

92 किलो:-  खंडू कालेकर (काले),  प्रवीण राजीवडे (आंबेगाव)

97 किलो:-  किरण घाडगे (माळेगाव), शुभम गराडे (धामणे)

86 ते 125 किलो (महाराष्ट्र केसरी गट):-विकास येनपुरे (येलघोल)

( वरिष्ठ गादी विभाग )

57 किलो:-  आकाश पडवळ (नवलाखउंब्रे), २) शुभम कालेकर (काले)

61 किलो:-  विजय सुतार (आढे)

65 किलो:-  अतिष आडकर (शिवली),  चेतन ठाकूर (उर्से),

70 किलो:-  प्रतीक शिंदे (वारंगवाडी),  दिनेश ठुले (मळवंडीठुले)

74 किलो:- अनिल कडू (वारू),  शुभम ठाकूर (उर्से)

79 किलो:-  प्रदीप तूुपे (गेव्हंडे),  मयुर पिंजण (किन्हई)

86 किलो:-  वैभव माळी (शेलारवाडी),  अनिकेत बोऱ्हाडे (ब्राम्हणवाडी)

92 किलो:-  अक्षय कारके (आढे),  ज्ञानेश्वर ठाकर (औंढोली)

97 किलो:-  समीर शिंदे (उर्से), विश्वनाथ येवले (पाचाणे)

86 ते 125 किलो (महाराष्ट्र केसरी गट):-  संदीप गराडे (पिंपळखुटे),  महादेव मोरे (वारंगवाडी)

मुलींमध्ये संस्कृती येवले समृद्धी भोसले, रुपाली ठोंबरे, जागृती साठे, गौरी राजगुरु, सावरी सातकर, उत्कर्षा चव्हाण, ऋतुजा आरसुले, प्रियंका पवार, सरस्वती थापा, गुड्डी शिंदे, तनिष्का गायकवाड, विशाखा लोहर, भक्ती जांभुळकर, सिद्धी ढोरे, मोनिका गाडे व यांनी आपआपल्या वजनी गटात विजेत्या ठरल्या आहेत.

स्पर्धेत पंच म्हणून मारुती आडकर, किसन बुचडे, मारुती सातव, मोहन खोपडे, बंडू येवले, रोहिदास आमले, चंद्रकांत मोहोळ, विजय कुटे, पप्पू कालेकर, निलेश मारणे, खंडू वाळूंज, राकेश सोरटे यांनी काम पहिले. स्पर्धेचे निवेदन निवेदक बाबाजी लिमन यांनी केले.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.