_MPC_DIR_MPU_III

Vadgaon Maval : मावळ विचार मंचाकडून शालेय साहित्य भेट देऊन झाले विद्यार्थ्यांचे स्वागत

एमपीसी न्यूज- शाळेतील पहिल्या दिवशी शाळेत पहिले पाऊल टाकणाऱ्या सुमारे 85 नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत मावळ विचार मंच आणि पंचायत समिती मावळ यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.

_MPC_DIR_MPU_IV

वडगांव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पंचायत समिती प्रांगणात झालेल्या कार्यक्रमात केशवनगर आणि ठाकरवस्ती येथे इयत्ता पहिलीमध्ये नवीन प्रवेश घेणाऱ्या सर्व बालकांना शालेय साहित्य संच भेट देण्यात आला. यामध्ये शालेय दप्तर, दुरेघी वही , चाररेघी वही, चौकटी वही, चित्रकला वही, रंगपेटी, कंपास पेटी, सिसपेन्सील, पट्टी, खोडरबर, शार्पनर, पाटी, पाटी पेन्सीलचा बॉक्स आणि पावसापासून साहित्याचे संरक्षण होईल अशी १ पिशवी असे शालेय साहित्य भेट देण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मावळ विचार मंचाचे संस्थापक अध्यक्ष भास्करराव म्हाळसकर होते. या प्रसंगी पंचायत समिती मावळच्या सभापती सुवर्णाताई कुंभार, माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर, माजी उपसभापती शांताराम कदम, गटविकास अधिकारी शरदचंद्र माळी आदी उपस्थित होते.

_MPC_DIR_MPU_II

भास्करराव म्हाळसकर यांनी संस्थेच्या कार्याचा परिचय करून देत मावळ विचार मंचाच्या माध्यमातून सुरू असलेल्या सरस्वती व्याख्यानमाला, मावळ पठार सुविधा कार्याची माहिती दिली तसेच यापुढेही शैक्षणिक क्षेत्रात असे कार्य सुरू राहील अशी ग्वाही दिली आणि विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्तिमत्वांची उदाहरणे देत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

या प्रसंगी उपस्थित सर्व मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करत विद्यार्थ्यांना भावी शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच मावळ विचार मंच करीत असलेल्या कार्याचे कौतुक केले.

या प्रसंगी उपसभापती जिजाबाई पोटफोडे, पंचायत समिती सदस्या ज्योतीताई शिंदे, मावळ विचार मंचाचे अध्यक्ष अतुल राऊत, गटशिक्षणाधिकारी मंगल वाव्हळ, वडगांव चे नगरसेवक प्रवीण चव्हाण,ऍड.विजयराव जाधव, दिनेश ढोरे, किरण म्हाळसकर, संजय गांधी निराधार योजनेचे तालुकाध्यक्ष किरण राक्षे, वडगांव विकास सोसायटीचे चेअरमन बाळासाहेब म्हाळसकर, वडगांव शहर भाजपा अध्यक्ष किरण भिलारे, विस्तार अधिकारी अब्दुल सत्तार मोमीन, केंद्र प्रमुख कांचन धोत्रे, नामदेवराव पोटफोडे, संतोष कुंभार, मुख्याध्यापिका सुलोचना साबळे, नारायण ढोरे, सोपानराव ढोरे, अरविंद पिंगळे, अरुण वाघमारे, नामदेव भसे, नंदकुमार दंडेल, रमण ढोरे, खंडू भिलारे, सोमनाथ काळे, यदुनाथ चोरघे, रवींद्र म्हाळसकर, मनोज गवारी, शरद मोरे, वैशाली म्हाळसकर, शीतल मुथा, अश्विनी बवरे, माधवी बोरावके तसेच विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे नियोजन राजश्री घोरपडे , ज्योत्स्ना पटेकर, स्मिता पवार , जयमाला जाधव , सुषमा घोरपडे, छाया जाधव, रुपेश महाडिक, बजरंग सूर्यवंशी या शिक्षकवृंदांनी केले. स्वागत डॉ.सुनील बाफना यांनी केले, प्रास्ताविक भूषण मुथा यांनी केले, सूत्रसंचालन अनंता कुडे यांनी तर आभार प्रदर्शन बाळासाहेब बोरावके यांनी केले.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.